फोंडशिरस येथे युवा कीर्तनकार ह.भ.प. नेहाताई भोसले यांचे सुश्राव्य कीर्तन होणार…
लोणंद गावचे सरपंच श्री. हनुमंत रुपनवर पाटील यांची लाडकी लेक व फोंडशिरस गावचे सदाशिव पाटील यांची सून स्वर्गीय सौ. जयश्री विजय वाघमोडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन.
फोंडशिरस (बारामती झटका)
फोंडशिरस येथील सामाजिक कार्यकर्त्या स्वर्गीय सौ. जयश्री विजय उर्फ बिनू वाघमोडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार दि. 06/07/2023 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार ह. भ. प. नेहाताई भोसले यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. कीर्तनानंतर पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. सदरच्या कार्यक्रमास मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे श्री. विजय उर्फ विनोद वाघमोडे पाटील व समस्त वाघमोडे पाटील परिवार यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
लोणंद गावचे सरपंच श्री. हनुमंत रुपनवर पाटील घराण्यातील सुसंस्कृत व घराण्याचा वारसा जपणारी लाडकी लेक जयश्री यांचा फोंडशिरस येथील प्रगतशील बागायतदार श्री. सदाशिव वाघमोडे पाटील यांचे चिरंजीव विजय उर्फ बिनू वाघमोडे पाटील यांच्याशी विवाह झालेला होता. रुपनवर पाटील आणि वाघमोडे पाटील या दोन घराण्याचे ऋणानुबंधाचे संबंध दृढ झालेले होते. सौ. जयश्री आणि श्री. बिनू वाघमोडे पाटील यांचा सुखी संसार सुरू होता. त्यांना कु. अहिल्या व चि. पृथ्वीराज अशी दोन मुले आहेत. सौ. जयश्री आई-वडिलांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन सासरमध्ये आपले वैवाहिक जीवन आनंदात व सुखासमाधानात सुरू होते. सुखी संसाराला दृष्ट लागावी अशी घटना वाघमोडे पाटील यांच्या परिवारामध्ये घडली.
स्वर्गीय जयश्री वाघमोडे पाटील यांचे अकाली दुःखद निधन झाले. लोणंदचे रुपनवर पाटील आणि फोंडशिरसचे वाघमोडे पाटील दोन्ही परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. बघता बघता स्वर्गीय सौ. जयश्री वाघमोडे पाटील यांना स्वर्गवासी होऊन वर्ष पूर्ण होत आहे.
प्रथम पुण्यस्मरण (वर्षश्राद्ध) निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व मित्र परिवार, नातेवाईक यांनी सर्व कार्यक्रमास उपस्थित राहावे असे, श्री विजय उर्फ बिनू वाघमोडे पाटील व समस्त वाघमोडे पाटील परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng