Uncategorizedक्रीडाताज्या बातम्या

फोंडशिरस येथे श्रीराम-बाणलिंग यात्रा महोत्सव निमित्त भव्य जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन #फोंडशिरस #श्रीराम-बाणलिंग यात्रा महोत्सव #कुस्ती

पै. संतोष जगताप विरुध्द पै. संदीप मोटे यांच्या होणार लढत…

फोंडशिरस (बारामती झटका)

फोंडशिरस ता. माळशिरस येथील श्रीराम-बाणलिंग यात्रा महोत्सवानिमित्त भव्य जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन समस्त ग्रामस्थ व यात्रा कमिटी फोंडशिरस यांच्यावतीने शुक्रवार दि. ३१/३/२०२३ रोजी दु. ३ वा. आयोजित करण्यात आले आहे.

सदर यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष प्रदीप गोरे, खजिनदार हनुमंत कुंभार (बाणलिंग विद्यालय, सभापती) तसेच सरपंच पोपट बोराटे, उपसरपंच दादा रणदिवे, ग्रामसेवक बंडलकर भाऊसाहेब तसेच ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल देवकर, राहुल धायगुडे, नागेश बोडरे, परशुराम शेंडे, हरिदास काळे, भानुदास मोटे, अभिषेक भोसले, भाऊसाहेब पाटील, आप्पासाहेब बंडगर, राहुल पाटील, पै. कृष्णा ढोबळे, सुनील मोरे आदींच्या वतीने या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कुस्ती मैदानामध्ये अरुण रामचंद्र देवकर (डी.वाय.एस.पी.), गणपत धायगुडे (ए.पी.आय.), उमाजी बोडरे माजी सरपंच यांच्यावतीने इनाम रुपये १ लाख रुपयांसाठी पै. संतोष जगताप शिवनेरी तालीम अकलूज, नामदेव वाघमारे यांचा पठ्ठा विरुद्ध पै. संदीप मोटे भोसले व्यायाम शाळा, पवार वस्ताद यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे. विक्रमसिंह मोटे (ए.पी.आय.) गणेश वाघमोडे पाटील (ए.पी.आय.) यांच्यावतीने इनाम रुपये १ लाख रुपयांसाठी पै. संदीप बोराटे, फोंडशिरस विरुद्ध पै. सचिन घोगरे, पुणे यांच्यात लढत होणार आहे. संतोष शिवाजी गोरे (डी.वाय.एस.पी.), महादेव कुंभार (पि.आय.) यांच्यावतीने इनाम रुपये १ लाख रुपयांसाठी पै. जमीर मुलाणी भालचंद्र पाटील यांचा पठ्ठा, फोंडशिरस विरुद्ध पै. बाळू अपराद पवार तालीम, सांगली यांच्यात लढत होणार आहे. तसेच यावेळी उद्घाटनाची कुस्ती पै. संग्राम मोटे, फोंडशिरस वि. पै. अप्पा दडस, नातेपुते यांच्यात लढत होणार आहे.

सदर कुस्ती मैदानाचे निवेदन पैलवान बापूराव कुंभार व पैलवान हनुमंत शेंडगे हे करणार आहे. या कुस्ती मैदानाच्या अधिक माहितीसाठी मो. ९०७५०९५२६३, ८९५६६०४१४० यावर संपर्क साधावा. तरी मल्लसम्राट, कुस्तीशौकीन, वस्ताद मंडळी व ग्रामस्थ यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button