चार चाकी व दुचाकीच्या धडकेत एक मुलगा जागीच ठार, तर दोन जखमी.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पुणे-पंढरपूर महामार्ग माळशिरस बायपास रोड मृत्यूचा सापळा बनला आहे…
माळशिरस (बारामती झटका)
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग पुणे-पंढरपूर रोडवर माळशिरस बायपास येथील यादव पेट्रोल पंपासमोर चार चाकी व दुचाकीच्या धडकेत एक मुलगा जागीच ठार तर दोन जखमी झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे.
याबाबतची माळशिरस पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दुचाकी गाडी नं. एमएच ४५ एक्स ३२९० ही यादव पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या बाजूला पाणी पिण्यासाठी थांबले होते. त्यानंतर पाणी पिऊन गाडी रस्त्यावर घेत असताना नातेपुतेकडून येणाऱ्या चारचाकी गाडी नं. एमएच १२ एफ ९४२९ या गाडीने पाठीमागून येऊन जोराची धडक दिल्याने मुलगा आयुष धीरज जाधव रा. निमगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर याला जोराची धडक बसल्याने तो जागीच ठार झाला असून यामध्ये उज्वला बाळासाहेब मगर, रा. निमगाव, शरद दिलीप माने रा. कुरवली, ता. इंदापूर, जि. पुणे अशी जखमींची नावे आहेत. सूर्यकांत रामचंद्र जाधव उर्फ बप्पा (रा. मळोली) हे निमगाव हद्दीत शेती असल्यामुळे शेतात राहत आहेत. धीरज जाधव हा त्यांचा नातू होता…

मयत आयुष धीरज जाधव याला दत्तक म्हणून घेतले होते. या घटनेमुळे दत्तक पुत्र हा कागदावरच दत्तक पुत्र राहिला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
यादव पेट्रोल पंपाजवळील चौक हा मृत्यूचा सापळा बनला असून याठिकाणी उड्डाणपूल होण्याची मागणी वाहनधारक तसेच नागरिकांतून होत आहे. लवकरात लवकर शासनाने याची वेळीच दखल घेणे आवश्यक असून, किती बळी घेणार हा मृत्यूचा चौक, असा सवाल संतप्त नागरिकांतून केला जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



