बचेरी येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बिजेचा कार्यक्रम संपन्न
पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून
बचेरी ता. माळशिरस या ठिकाणी सालाबादप्रमाणे कै. बजरंग कुंभार यांच्या कुटुंबामध्ये बचेरी येथील कुंभार परिवाराने ग्रामस्थांच्या सहकार्याने व भक्तिभावाने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या बिजेचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये बचेरी येथील परशुराम भजनी मंडळाने अतिशय चांगल्या पद्धतीने भजनाचा कार्यक्रम सादर केला. व अभंगातून तुकोबारायांच्या जीवनाचे रहस्य गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
सदर कार्यक्रमाच्या शेवटी पुष्पवृष्टी करून ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज आणि पांडुरंगांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता केली. कुंभार परिवाराने सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करून उपस्थितांचे दत्तात्रेय बजरंग कुंभार व सौ. छाया बजरंग कुंभार आणि परिवाराने आभार मानले.
या कार्यक्रमाला बचेरी व परिसरातील जगदीश गोडसे, बंडोपंत यादव, पांडुरंग देवकर, सत्यवान यादव, सोमनाथ यादव, अनिल यादव, समाधान कुंभार, बसवेश्वर कुंभार व असंख्य भाविक भक्त उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng