बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन केले बॅल्कमेल

बारामती (बारामती झटका)
गणेश सर्जेराव पवार रा. बारामती यांनी सविता विजय नायकुडे यांच्या विरुद्ध बारामती पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. सविता विजय नायकुडे यांनी अनैतिक संबंध ठेवून गणेश सर्जेराव पवार यांच्याकडे सतत पैशांची मागणी केली. या त्रासाला कंटाळून गणेश सर्जेराव पवार यांनी बारामती पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.
सदर तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की,
फिर्यादी जबाब दिनांक: 17/03/2025
गणेश सर्जेराव पवार, वय 39 वर्षे, व्यवसाय – ट्रान्सपोर्ट, रा. प्रगतीनगर, तांदुळवाडी रोड, बारामती, ता. बारामती, जि. पुणे. मुळ रा. एरंडोली, ता. श्रीगोदा, जि. अहिल्यानगर.
मी वरील ठिकाणी माझी पत्नी कांचन, मुलगी तनुजा आणि मुलगा राजवर्धन यांच्यासोबत एकत्र राहतो. मी ट्रान्सपोर्टचे काम करून कुटुंबाची उपजीविका चालवतो.
घटनेचा तपशील :
जून 2024 : मी माळेगाव येथे MS – फिटनेस क्लब येथे जिमला जात होतो. तेथे माझी ओळख सविता विजय नायकुडे, वय 38 वर्षे, रा. मळद, ता. बारामती, जि. पुणे, मुळ रा. मु. पोस्ट आझादपुर, ता. कोरेगाव, जि. सातारा हिच्याशी झाली.
ओळखीचे रूपांतर मैत्रीत : आमची ओळख वाढत गेली आणि आम्ही पुणे, महाबळेश्वर, उज्जैन आणि तिरुपती येथे फिरायला गेलो. त्या दरम्यान आमच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.
खाजगी फोटो : फिरायला गेल्यानंतर सविताने आमचे प्रायव्हेट फोटो तिच्या मोबाईलमध्ये काढून ठेवले.
ब्लॅकमेलिंग व आर्थिक शोषण :
दि. 10/07/2024 पासून सविताने हे फोटो दाखवून पैशांची मागणी सुरू केली 13/07/2024 रोजी मी तिला भीतीपोटी 55,000 रुपये दिले. त्यानंतर वेळोवेळी तिने ब्लॅकमेल करून पैसे मागितले. सविताने गळफास घेत असल्याचे फोटो पाठवून धमकी दिली. ऑगस्ट 2024 मध्ये मी तिला भीतीपोटी 1,75,000 रुपये किंमतीचे डायमंडचे मंगळसूत्र चंदुकाका सराफ येथून करून दिले. ऑगस्ट 2024 ते 17 मार्च 2025 मी सविताच्या फोन-पे अकाऊंटवर 2,81,600 रुपये वेळोवेळी पाठवले.
अधिक त्रास व धमक्या :
सविता वारंवार जास्त रकमेची मागणी करू लागली. पैसे दिले नाहीतर तिने बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तिने प्रगतीनगर, बारामती येथील माझ्या राहत्या घरी येऊन मला व माझ्या पत्नीला अश्लील शिवीगाळ करून धिंगाणा घातला. पैसे देणे बंद केल्यावर तिने माझ्या पत्नीच्या मोबाईलवर शिवीगाळ आणि आत्महत्येच्या धमक्या द्यायला सुरुवात केली.
पूर्वीचे प्रकार :
मला समजले आहे की, सविता विजय नायकुडे हिने यापूर्वीही बारामतीतील प्रतिष्ठित लोकांना जाळ्यात ओढून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून ब्लॅकमेल करून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले आहेत.
आत्महत्येचा प्रयत्न :
सविताच्या त्रासाला कंटाळून मी आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझ्या पत्नी कांचनला हे समजले. मी तिला घडलेली हकीकत सांगितली आणि आज सविताविरुद्ध तक्रार देण्यासाठी आलो आहे.
तरी दि. 10/07/2024 रोजी ते दि. 17/03/2025 रोजी पर्यंत महीला नामें सविता विजय नायकुडे, वय 38 वर्षे, रा. मळद, ता. बारामती, जि. पुणे, मुळ रा. मु. पो. आझादपुर, ता. कोरेगाव, जि. सातारा, हिने माझेवर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करते, अशी धमकी देवुन मला वेळोवेळी बॅल्कमेल करुन माझेकडे खंडणीची मागणी करून रोख रक्कम 2,81,600/- (दोन लाख एक्याऐंशी हजार सहाशे रुपये) व डायमंडचे मंगळसुत्र 1,68,000 रुपये खंडणी रुपाने घेतले आहेत. म्हणुन माझी सविता विजय नायकुडे, वय 38 वर्षे, रा. मळद, ता. बारामती, जि. पुणे, मुळ रा. मु. पो. आझादपुर, ता. कोरेगाव, जि. सातारा यांचे विरुध्द कायदेशिर फिर्याद आहे. दाखल अंमलदार पो. हवा टापरे ब. नं. 3289 तपासी अंमलदार, पो. हवा. खाडे ब.नं 2628 यांच्या समक्ष हा जबाब दिला.
या घटनेचा अधिक तपास बारामती पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.