मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुंबई-सोलापूर विमान सेवेचे पहिले प्रवासी ठरणार….

सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्याच्या वतीने स्वागत करणार….
सोलापूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस लवकरच सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. अनेक दिवसांपासून रखडलेली मुंबई-सोलापूर विमान सेवा सुरू झालेली असून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुंबई-सोलापूर विमानसेवेचे पहिले प्रवासी ठरणार आहेत. सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणार हा दुग्धशर्करा योग समजला जातोय.
सोलापूर शहरामध्ये विमान सेवा सुरू करण्यासाठी साखर कारखान्याची चिमणी आड येत होती. चिमणी जमीनदोस्त केल्यानंतर विमान सेवा सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या. सोलापूर विमान सेवा विकसित होण्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष प्रयत्न केले. योगायोगाने मुरलीधर मोहोळ यांच्याकडे नागरी विमान खात्याचे राज्यमंत्री पदाची जबाबदारी आलेली होती. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची केंद्रात मागणी व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सततचा पाठपुरावा यामुळे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक व सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी निर्णय घेऊन पहिल्यांदा सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू करण्यात आली. सोलापूर वरून उद्योग व्यवसायासाठी पुणे व मुंबई या ठिकाणी दैनंदिन ये-जा करण्याकरिता सोलापूर -पुणे-मुंबई विमान सेवा सुरू होण्याची मागणी सातत्याने होत होती.

मुंबई-सोलापूर सेवा सुरू होत असून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुंबई-सोलापूर विमान सेवेचे पहिले प्रवासी ठरणार आहेत. त्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्याच्या वतीने स्वागत करणार आहेत…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



