ताज्या बातम्याराजकारण
माळशिरस तालुक्यातील शरदचंद्र पवार मुळ जुना निष्ठावान नेते व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे शिवतीर्थ बंगला येथे आयोजन.

माळशिरस (बारामती झटका)
माढा लोकसभा मतदार संघातील माळशिरस तालुक्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील शरदचंद्र पवार निष्ठावान नेते व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन सोमवार दि. 22/04/2024 रोजी सायंकाळी 05 वाजता पुणे-पंढरपूर रोडवरील हॉटेल द मेरिडियन एक्झिक्युटिव्हच्या पाठीमागे शिवतीर्थ बंगला येथे करण्यात आले आहे.
सदरच्या बैठकीस शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्री. शंकरनाना देशमुख यांनी केलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.