बिरोबा देवस्थानचे माजी विश्वस्त राजाराम कोळेकर यांचे दुःखद निधन
आरेवाडी ( बारामती झटका )
आरेवाडी येथील माजी उपसरपंच राजाराम गणू कोळेकर (भुंगे) यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७० वर्षे होते. राजाराम कोळेकर हे मागील काही महिन्यांपासून मधुमेह आजारामुळे त्रस्त होते. उपचारासाठी त्यांना सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचाराला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांना घरी आणले होते. त्यानंतर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली.
राजाराम कोळेकर आरेवाडी गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होते. गावाच्या शैक्षणिक विकासासाठी ते मराठी शाळेतील मुलांना नेहमी प्रोत्साहन देत असत. ते शांत, संयमी व विचारशील स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या सहवासात एखादा रागीट माणूस आला तर तो शांत होत असे. एकत्र कुटुंबाची जबाबदारी त्यांनी एकेकाळी समर्थपणे सांभाळीत कौटुंबिक प्रगतीचा आदर्श त्यांनी घालून दिला.
राजाराम कोळेकर १९८४ ते १९९२ या काळात उपसरपंच होते. त्यानंतर काही वर्षे आरेवाडी वि. का. से. सोसायटीचे चेअरमन होते. नंतर ते २०१५-१६ मध्ये दुसऱ्यांदा उपसरपंच झाले होते. तसेच त्यांनी बिरोबा देवस्थान ट्रस्टमध्ये विश्वस्त म्हणून देखील कार्य केले आहे. राजाराम कोळेकर यांनी शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग केल्यामुळे एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी आणि सुना व नातवंडे असा परिवार आहे. फौजी सुभाष कोळेकर यांचे ते वडील होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Excellent content! The clarity and depth of your explanation are commendable. For a deeper dive, check out this resource: EXPLORE FURTHER. What do you all think?