Uncategorized

ब्राह्मण महाशिखर परिषद भारत काढणार – ब्राह्मण संघर्ष यात्रा प्रवक्ते मोरेश्वर मार्डीकर

माळशिरस (बारामती झटका)

ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यासाठी अनेक दिवसापासून ब्राह्मण महाशिखर परिषद भारत प्रयत्न करीत असून वेळोवेळी शासनाकडे वेगवेगळ्या माध्यमातून निवेदने देण्यात आलेली आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांकडून फक्त अश्वासन दिले जातात. मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलनानंतर तात्कालिक मुख्यमंत्री आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देत तत्वतः मान्यता दिली होती. त्यावर पुढील कोणत्याच हालचाली न झाल्याने राज्यातील ब्राह्मण समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याने ब्राह्मण महाशिखर परिषद भारत पुन्हा एकदा रस्त्यावर येणार आहे.

ब्राह्मण संघर्ष यात्रा दि. ९/१२/२०२२ रोजी माहूरगड येथून परशुरामाचे पूजन करून यात्रेचा १४ डिसेंबर रोजी मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक दादर या ठिकाणी समारोप होईल. यामध्ये विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात येणार आहे.

सदर निवेदनात असे नमुद करण्यात आले की, ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे –

१) ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी व त्यात 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी.
२) पुण्यातील शनिवार वाडा येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे सृष्टी व युद्धाच्या इतिहासाचे पेशवे संग्रहालय स्थापन करण्यात यावे.
३) प्रत्येक जिल्ह्यात ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना वस्तीगृह बांधून देण्यात यावेत.
४) ब्राह्मण समाजातील शेतकऱ्यांना शेतीची अवजारे व ट्रॅक्टर यांना अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे.
5) बार्टी व सारथीच्या धरतीवर एक लोकमान्य योजना ब्राह्मण समाजासाठी द्यावी.

महाराष्ट्रातून संघर्ष यात्रेमध्ये हजारो समाज बांधव येतील असा विश्वास ब्राह्मण महाशिखर परिषदेचे अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांनी मीटिंगमध्ये व्यक्त केला. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये सध्या नियोजन आढावा बैठका सुरू आहेत. या बैठकांमध्ये समाजातील सर्व बांधवांनी उपस्थित राहावे, तसेच संघर्ष यात्रेमध्ये जास्तीत जास्त समाज बांधवांनी यावे, अशी विनंती प्रवक्ते मोरेश्वर मार्डीकर यांनी केली आहे. या बैठकीमध्ये उपाध्यक्ष अशोक वाघ, विजय पिंगळे, अनिल कुलकर्णी, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत दंडके, सचिव ॲड. प्रसाद देशमुख, कोषाध्यक्ष उदय मुळे, प्रवक्ते पंकज कुलकर्णी, संपर्कप्रमुख मोहनजी योगी व वैभव कुलकर्णी, संतोष डोईफोडे, संतोष जोशी, निरंजन संत आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button