Uncategorizedताज्या बातम्या

भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे कुंभेजच्या वैभवात मोलाची भर – प्राचार्य सुभाष नागटिळक

श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात थाटात संपन्न

माढा (बारामती झटका)

माढा तालुक्यातील कुंभेज येथील बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त झोनल ऑफिसर विजय गोविंद कुलकर्णी व नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी अंदाजे 50 लाख रुपये रकमेचे भव्य आणि दिव्य खूपच आकर्षक असे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून श्रीराम मंदिर उभारले असून त्यामध्ये राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, श्रीगणेश व दत्त यांच्या सुंदर मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करून या मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला असून त्यामुळे कुंभेजच्या वैभवात मोलाची भर पडल्याचे गौरवोद्गार सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष नागटिळक यांनी काढले आहेत. ते कुंभेज ता. माढा येथे नव्याने बांधलेल्या भव्य श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर बोलत होते.

याबाबत माहिती देताना विजय कुलकर्णी यांनी सांगितले की, ज्या गावात जन्म घेतला त्या गावामध्ये श्रीरामाचे भव्य आणि दिव्य मंदिर उभारावे अशी माझी अनेक वर्षापासूनची मनोमन सुप्त इच्छा होती. माझा मुलगा व कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हे अत्याधुनिक आकर्षक व सुंदर असे श्रीराम मंदिर गावात उभारल्याचा मनस्वी आनंद झाल्याचे सांगितले. भविष्यात या श्रीराम मंदिराच्या माध्यमातून अनेक धार्मिक व समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला गावातून मोठ्या भक्तीमय वातावरणात सर्व मूर्तीची ढोल ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थ व युवकांनी मोठा जल्लोष केला.या सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना व पौरोहित्य विजय कुलकर्णी व योगेश कुंभेजकर यांनी केले. शेवटी सर्व ग्रामस्थ व भाविकांना संयोजकांनी महाप्रसादाचे वाटप केले.

यावेळी प्राचार्य सुभाष नागटिळक, बालाजी देवस्थानचे पुजारी बंडोपंत कुलकर्णी, अरविंद कुलकर्णी, अरुणा कुलकर्णी, सुनिता कुलकर्णी, शिवांगी कुंभेजकर, सरपंच परमेश्वर कांबळे, उपसरपंच मदन आलदर, चेअरमन औदुंबर पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ नागटिळक, डॉ. चंद्रकांत होनमाने, प्राचार्य विठ्ठल नागटिळक, प्रवीण गवसाणे, प्रभाकर धावणे, बिभिषण नागटिळक, नागनाथ नागटिळक, दिनेश नागटिळक, बाबुराव नागटिळक, राजेंद्र गोरे यांच्यासह ग्रामस्थ व युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button