भांबुर्डी येथे श्री काळभैरवनाथाच्या यात्रेस उत्साहात सुरुवात
भांबुर्डी (बारामती झटका)
भांबुर्डी ता. माळशिरस, येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री काळभैरवनाथाची यात्रा मंगळवार दि. ११/४/२०२३ ते गुरुवार दि. १३/४/२०२३ या तीन दिवशी संपन्न होत आहे.
मंगळवार दि. ११/४/२०२३ रोजी सकाळी ७ वा. श्री काळभैरवनाथाची महापूजा, सायंकाळी ६ वा. देवाचा लग्न सोहळा, देवाचा कुसुंबा (प्रसाद) चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच याच दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. त्यामध्ये फास्ट सायकल, रनिंग मोठा गट मुले, रनिंग मध्यम गट मुले, रनिंग लहान गट मुले, रनिंग मोठा गट मुली, रनिंग मध्यम गट मुली, रनिंग लहान गट मुली अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

बुधवार दि. १२/४/२०२३ रोजी दुपारी १२ वा. श्री काळभैरवनाथ मंदिरासमोर काळ भैरवनाथ गजी ढोल मंडळ, भांबुर्डी व महालिंगेश्वर गजी ढोल मंडळ, खुडूस यांचा गजी ढोल कार्यक्रम होणार आहे. तसेच या दिवशी तीन पायांची शर्यत, संगीत खुर्ची मुले, संगीत खुर्ची मुली, लिंबू चमचा मुली, घागरी स्पर्धा मुली, डोळे बांधून मडके फोडणे, सायकल स्पर्धा, गाढवाला शेपूट लावणे अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री ८.३० वा. महाराष्ट्रात गाजलेल्या टेंभुर्णी येथील रंगबहार ऑर्केस्ट्रा चे आयोजन देखील करण्यात आले आहे.
गुरुवार दि. १३/४/२०२३ रोजी सकाळी ७.३० वा. श्री काळभैरवनाथाचा अभिषेक व रथातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ७ वा. श्रीनाथ मंदिर येथे भव्य बक्षीस वितरण समारंभ देखील होणार आहे. त्याचबरोबर दुपारी ३ वा. भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

शुक्रवार दि. १४/४/२०२३ रोजी दुपारी १ वा. बैलगाडीच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त भाविकभक्तांनी या यात्रेस उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng