भांब येथील उद्योजक शिवाजीराव पाटील यांच्या परिवारांचा श्रावण महिन्यात स्तुत्य उपक्रम..
शिंगणापूरच्या पर्वतरांगेत वसलेल्या संभाजी बाबा दरा येथे शंभू महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अन्नदान करण्यात येते.
भांब (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याच्या सरहद्दीवर शिंगणापूरच्या पर्वतरांगेत संभाजी बाबा दरा येथे शंभू महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पाटील परिवार यांचेकडून अन्नदान करण्यात येते. भांब गावातील उद्योजक शिवाजीराव पाटील यांच्या परिवारांचा श्रावण महिन्यात स्तुत्य उपक्रम असतो. या उपक्रमाचे अनेक भाविक लाभ घेत असतात.
संभाजी बाबा दरा निसर्ग रम्य परिसर आहे. डोंगरदऱ्या, कपाऱ्या असणाऱ्या ठिकाणी संभाजी बाबाचे वास्तव्य होते. सदरचे पवित्र स्थान पुनित व पावन आहे. पूर्वीपासून या ठिकाणाची वेगळी आख्यायिका आहे. संभाजी बाबा दरा या ठिकाणी जाण्या-येण्याची अडचण आहे. विशेष म्हणजे कोणत्याच मोबाईलला रेंज येत नाही. अशा दुर्गम व निसर्गरम्य परिसरात संभाजी बाबा दरा याठिकाणी शंभू महादेवाची पिंड व नंदी आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यात अनेक भाविकभक्त दर्शनासाठी येत असतात.
भांब गावचे माजी पोलीस पाटील मारुती संभाजी पाटील यांच्या घराण्याची परंपरा आहे. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी येणाऱ्या भाविकांना ते अन्नदान करीत असतात. संभाजी बाबा दरा कुस्ती कमिटी आहे. श्रावण महिन्यातील दुसऱ्याच सोमवारी भव्य जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन केले जाते. श्रावण महिन्यात भाविकांची वर्दळ जास्त असते. उद्योजक शिवाजीराव पाटील यांच्या परिवारांचा श्रावण महिन्यातील अन्नदानाच्या स्तुत्य उपक्रमाचा भाविक लाभ घेत असतात. याही वर्षी कळी, भात, लापशी व रस्सा भाजी असे पदार्थ करून लोकांना अन्नदान केलेले आहे. यावेळी दिवसभर भाविकांची सेवा करण्याकरता उद्योजक शिवाजीराव पाटील, माजी पोलीस पाटील मारुती संभाजी पाटील, दत्तू पाटील, तानाजी पाटील, रणजीत पाटील, रविराज पाटील, हनुमंत पाटील, सुधीर पाटील, आजिनाथ पाटील, स्नेहल पाटील, सोनाली पाटील, विजया पाटील, रोहीनी पाटील, इंदू पाटील, केशर पाटील, राधिका पाटील, धुरपबाई पांढरे आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng