भाजपचे विधान परिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाच्या उद्घाटनात भाजपचे विधानसभेचे आ. राम सातपुते यांना वगळले…
भारतीय जनता पक्षात प्रोटोकॉल पाळला जातो मात्र, मोहिते पाटील परिवार यांनी लोकप्रतिनिधी यांना वगळले असल्याने वरिष्ठ पातळीवरून दखल घेतली जाईल का ?
माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ताराराणी महिला केसरी 2023 मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दि. 5 मे 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजता होणार आहे. सदरच्या उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेत स्थानिक लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांचे पत्रिकेत नाव नसल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे. भाजपच्या आमदाराच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या आमदाराला वगळले असल्याने भारतीय जनता पक्षात प्रोटोकॉल पाळला जातो, शिस्तीचा पक्ष मानला जातो. मात्र, मोहिते पाटील परिवार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी यांना वगळले असल्याने वरिष्ठ पातळीवर याची दखल घेतली जाईल का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विधान परिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ताराराणी महिला केसरी 2023 या कार्यक्रमाचे उद्घाटन दि. 05 मे 2023 रोजी होणार असून दि. 07 मे 2023 पर्यंत तीन दिवस स्पर्धा चालणार आहेत. सदरच्या कार्यक्रम पत्रिकेत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सौ. नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील उद्घाटक असून जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासह सोलापूर व सातारा जिल्ह्यातील आजी-माजी आमदार व त्यांचे वारसदार आणि हितचिंतक यांची नावे आहेत. मात्र, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे पत्रिकेत नाव नसल्याने समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमाचे संयोजनामधील धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील हेही भाजपचे नेते आहेत तरीसुद्धा लोकप्रतिनिधी यांना का वगळले गेले ?, उद्घाटनाचा कार्यक्रम घरगुती नाही, कार्यक्रमाला सार्वजनिक स्वरूप आहे. अनेक वेगवेगळे नेते व लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या पक्षाचे बोलवलेले असताना मोहिते पाटील परिवार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार राम सातपुते यांना घरचा आहेर दिलेला आहे. याची दखल भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून घेतली जाईल का ?, अशी उलटसुलट चर्चा भाजपमध्ये व तालुक्यामध्ये सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Good day! Do you know if they make any plugins to help with Search Engine Optimization? I’m trying to get my site to rank for some targeted
keywords but I’m not seeing very good results. If you know of any please share.
Kudos! You can read similar text here: Eco bij