भाजपचे संघटन महामंत्री तथा शिवामृतचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
शिवामृत दूध संघाच्या चेअरमनपदी धैर्यशील मोहिते पाटील तर, व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय भिलारे यांची बिनविरोध निवड.
अकलूज ( बारामती झटका )
भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा संघटन महामंत्री धैर्यशीलजी मोहिते पाटील यांची शिवामृत दूध संघाच्या पुनश्च चेअरमन पदी निवड झालेली आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समिती व विविध गावचे लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धैर्यशील भैया यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. माळशिरस तालुक्यातील राजकारणातील चाणक्य म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे पाहिले जाते. विजयसिंह मोहिते पाटील महाराष्ट्राचे राजकारण करीत असताना माळशिरस तालुक्याची जबाबदारी जयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे होती. नवीन पिढीत विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या राजकारणाला माळशिरस तालुक्यात बेरजेचे राजकारण धैर्यशील मोहिते पाटील यांचे सुरू आहे. शिवामृत संघाच्या चेअरमन पदी पुनश्च निवड झालेली असल्याने शिवामृत दूध संघाच्या कार्यालय निवासस्थानी व अकलूज येथील संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची शुभेच्छा देण्यासाठी रीग लागलेली आहे.
शिवामृत दूध संघाच्या निवडी प्रसंगी धैर्यशील मोहिते पाटील बोलताना म्हणाले, सहकारात गावपातळीवर सोसायटीला ऑडिट करावे लागते. खाजगी दूध उद्योगांना ऑडिट नाही, शासनाचे त्यांना कोणतेही नियम नाहीत. समान पातळीवर या गोष्टी झाल्या पाहिजेत तर सहकाराच्या मागे शासनाने उभा राहिले पाहिजे, असे मत शिवामृत संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.


डॉ. महेश कदम विभागीय उपनिबंधक सहकारी दुग्ध संस्था पुणे यांच्या अध्यक्षतेखाली शिवामृत दूध संघ येथे नूतन संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेपुढील विषयांमध्ये नवीन संचालक मंडळ सदस्यातून चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या निवडी पार पडल्या आहेत. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांची शिवामृत दूध संघाच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमन म्हणून दत्तात्रय भिलारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नूतन संचालकांना मार्गदर्शन करताना चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील बोलत होते. यावेळी सहकारी संस्थांच्या व्यथा मांडताना चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, खाजगी व्यवसायाकडून होणारी दुधाची भेसळ याबाबत शासनाने कडक धोरण राबविले पाहिजे नाहीतर पुढील पिढी आपल्यास माफ करणार नाही. याकरिता शासनाने समिती नेमावी. सध्या दूध संघाची व्याख्या बदलली पाहिजे. दूध आणि कृषी अन्नप्रक्रिया उद्योग अशी व्याख्या होणे गरजेचे आहे. सहकाराचे दुःख शासनाने समजून घेतले पाहिजे. सहकाराच्या मागे शासनाने खंबीर उभा रहावे.
शेतकऱ्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहावे, असे सहकार महर्षी हे सांगत होते, म्हणून त्यांनी शिवामृत दूध संघाची स्थापना केली. माळशिरस तालुक्यात उच्च दर्जाचे दूध आहे. दुधाचा खाजगी व्यवसाय करणारे दुधात भेसळ करून पुढची पिढी बरबाद करत आहेत. जेवढे उपपदार्थ दुधापासून बनवता येतील त्यास शासनाने अनुदान द्यावे अशीही मागणी यावेळी चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली. तर शिवामृत दूध संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच पेढ्याला जास्त मागणी आहे. देशाच्या दोन्ही टोकाला शिवामृत दूध संघाचे पदार्थ गेला आहे असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.


यावेळी कार्यकारी संचालक रविराज इनामदार देशमुख, नूतन संचालक हनुमंत शिंदे, विजय नरोटे, दादासाहेब शिंगाडे, भास्कर तुपे, त्रिंबक इंगळे, शरद साळुंखे, अरुण थिटे, जगन्नाथ जाधव, बाळासाहेब देशमुख, सुभाष शिंदे, पोपट बर्वे, नारायण सालगुडे पाटील, बाळासाहेब पराडे, अरविंद भोसले, शारदा पिसे, माधुरी फडतरे, संजय गोरे, सचिन वाघमोडे, सुरेश पिसे आदि नूतन संचालकासह, माजी संचालक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng