भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर महत्त्वाच्या पदापासून वंचित, संधी मिळणार का ?
माळशिरस ( बारामती झटका )
भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर महत्त्वाच्या पदापासून वंचित राहिलेले आहेत. महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळणार का ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
माळशिरस तालुक्यातील कण्हेर गावचे रहिवासी असणारे अनेक वर्षापासून माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व माळशिरस शहराच्या माजी सरपंच ॲड. संजीवनीताई पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. माळशिरस तालुक्याच्या अनेक प्रश्नांवर भाजपची आंदोलने मोर्चे होत असतात. त्यावेळी बाळासाहेब सरगर यांचा सहभाग नेहमी असतो. पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असतात. त्यांची माळशिरस नगरपंचायतीचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती, ती जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या माळशिरस तालुका अध्यक्ष व सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत होते. दोन्ही वेळेला अध्यक्ष पदाने हुलकावणी दिलेली आहे. केंद्रात व राज्यात भाजपच्या विचाराचे सरकार आहे, त्यामुळे निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. दूरसंचार विभागाच्या सदस्य पदी सोपान काका नारनवर यांची निवड करण्यात आलेली आहे. सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर के. के. पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे. तालुक्यात व जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या कमिट्या आहेत, अशा कमिट्यावर बाळासाहेब सरगर यांची वर्णी लागणार का ?, असा प्रश्न निर्माण होत आहे.
माढा लोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, विधानसभेचे आ. राम सातपुते या तिनही लोकप्रतिनिधींशी बाळासाहेब सरगर यांचे सलोख्याचे संबंध आहेत. महत्त्वाच्या पदापासून उपेक्षित असणारे बाळासाहेब सरगर यांना संधी मिळावी, अशी बाळासाहेब सरगर यांच्या समर्थकातून बोलले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great article! I loved the humor you infused into the topic. For a deeper dive, check out this link: EXPLORE NOW. What do you think?