बारामती झटका वेब पोर्टल वर्धापन दिनास बिगर राजकीय व्यक्तीकडून एक लाख रुपयाने सुरुवात…

बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे विचारांच्याच लोकांकडून वर्धापन दिनाला जाहिराती स्वीकारल्या जातील..
मळोली (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील मळोली सारख्या स्वाभिमानी व सर्व क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या ग्रामपंचायत हद्दीतील साळमुखवाडी गावचे ग्रामदैवत साळुबाई देवीच्या नावाने साळुबाई वार्तापत्र पाक्षिक 2008 सुरू केलेले होते. महिन्यातून दोनदा पाक्षिक निघत असल्याने वाचकांना पंधरा दिवस ताटकळत बसावे लागत होते. यासाठी 2009 साली बारामती झटका साप्ताहिक सुरू केले. पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक पुणे येथे प्रकाशन केलेले होते. दर गुरुवारी महिन्यातून चार वेळा साप्ताहिक व दोन वेळा पाक्षिक असा प्रवास सुरू झाला. उपेक्षित लोकांना न्याय द्यायची भूमिका कायम ठेवली. वेळप्रसंगी प्रशासनाचे वाभाडे ओढून प्रस्थापितांचे वास्तव निर्भीड व सडेतोडपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखाद्या गोरगरीब व सर्वसामान्य जनतेचे बातमीच्या वृत्तांकनाने काम झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद एक लाख रुपये जाहिरातीपेक्षा मोठा वाटत होता. वाचकांच्या पसंतीला व सडेतोड लिखाणाने बारामती झटका साप्ताहिक तालुक्यामध्ये खेडोपाडी वाड्यावस्त्यांवर पोहोचलेले होते.
जग एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना काळानुसार समाज माध्यमांमध्ये अनेक बदल होत गेले. बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल 2018 साली सुरू केले. वेब पोर्टल सोशल मीडियावर अल्पावधीत लोकप्रिय ठरले. वाचकांची पसंती वाढत गेली. अनेकांच्या सूचना आल्या, बारामती झटका यूट्यूब चॅनल सुरू करावे. त्याप्रमाणे 2019 मध्ये यूट्यूब चॅनल सुरू केले. युट्युब चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर प्रेक्षकांना नोटिफिकेशनच्या माध्यमातून चॅनलवर बातमी पडल्यानंतर कळत होती. तसेच वेब पोर्टल वाचकांना कळावे यासाठी बारामती झटका अँड्रॉइड ॲप सुरू केले.

बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनल वाचक व प्रेक्षकांच्या सहकार्याने गुगलच्या अधिकृत जाहिरातीवर वेब पोर्टल व चॅनल गेलेला आहे. डिजिटल मीडियामध्ये बारामती झटका न्यूज यांनी नावाचा दबदबा निर्माण करून जनमानसांत लोकप्रियता मिळविलेली आहे.

“दिसलं तेच छापलं” यामुळे प्रेक्षक व वाचक यांनी अनेकांना जाहिरातीचे पैसे दिले जातात मात्र, बारामती झटका न्यूज चॅनलची खैसीयत आहे, दर्जेदार उत्कृष्ट व जनहिताच्या बातमीला सुद्धा मानधन दिले जाते. वेब पोर्टल वर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम, जागरण गोंधळ, लग्न समारंभ, वाढदिवस, कुस्ती, राजकीय कार्यक्रम, सभा, मेळावे, निवडणूक आरक्षण, निवडणूक प्रक्रिया निकाल या सर्वांचे बारामती झटका न्यूज चॅनलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करून सर्व जाती धर्मातील लोकांशी आपुलकी जिव्हाळा व मैत्रीचे नाते निर्माण केलेले आहे.
राजकीय सडेतोड लिखाणामध्ये 10 टक्के राजकारणी नाराज असतील परंतु 90% जनता हक्काचे व्यासपीठ म्हणून बारामती झटका न्यूज चॅनलकडे पाहत आहे.

पंधरा वर्ष पत्रकारिता करताना रात्रंदिवस मोटरसायकलवर प्रवास केला. गेल्यावर्षी मित्रपरिवार व नातेवाईक यांच्या सहकार्याने स्वप्नपूर्ती इनोवा गाडी घेतली. सदर गाडीचे 55,400 किलोमीटर प्रवास झालेला आहे. लवकरच स्वप्नसाकार फॉर्च्युनर घेण्याचा मानस आहे. 2000 हजार, 3000 हजार, 5000 हजार, 7000 हजार, 10000 हजार, 25000 हजार, 50000 हजार, 75000 हजार, एक लाख रुपये जाहिरात स्विकारली जाईल.
वेब पोर्टल व युट्युब चॅनल धुमधडाक्यात सुरू आहे. दरवर्षी वर्धापन दिन साजरा केला जातो. सर्व क्षेत्रातील वाचक व प्रेक्षक आपल्या परीने सहकार्य करीत असतात. यंदाच्या वर्षी बारामती झटका वर्धापन दिनास बिगर राजकीय व्यक्तीकडून एक लाख रुपयाने सुरुवात झालेली आहे. हीच खरी पत्रकारितेची पोचपावती आहे.
सातवा वर्धापन दिनास सोमवार दिन. 14/07/2025 रोजी सुरुवात केलेली आहे. बारामती झटका वर्धापन दिन कशा पद्धतीने राहील, याची रूपरेषा सोशल मीडियाच्या मधून समाज माध्यमांच्या समोर जाहीर केलेली होती ती अशा पद्धतीने होती..
शब्दाचा पक्का पत्रकारितेतील हुकमी एक्का
बारामती झटका वेब पोर्टल सातवा वर्धापन दिन 2025 सुरू होत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सांगता सभेच्या वेळी जाहीर केल्याप्रमाणे माढा लोकसभेचे पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते, शेळी मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते ॲड. सुभाष (अण्णा) पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व माळशिरस नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका ॲड. संजीवनीताई पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष युवा नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या विचारांच्या लोकांकडूनच वर्धापन दिनाला जाहिरात घेतली जाईल, असे जाहीर केलेले होते. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सरकारमधील महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्यासारख्या अनेक कॅबिनेट व राज्यमंत्री यांच्याकडून वर्धापन दिनासाठी जाहिराती घेतल्या जातील. मात्र, विरोधी विचारांच्या लोकांकडे वर्धापन दिनाचे पत्र दिसणार नाही हा ठाम आणि निश्चित निर्धार आहे.
संपादक,
श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील उर्फ निवास काका
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



