भाजप शिक्षक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ. प्रशंम कोल्हे यांची निवड.
मुंबई (बारामती झटका) मनोज गायकवाड यांजकडून
भाजपच्या शिक्षक आघाडीच्या प्रदेश संयोजक तथा अध्यक्षपदी डॉ. प्रशंम कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. कोल्हे यांची या पदावर नियुक्ती केल्याचे आज मुंबई येथे घोषित केले.
डॉ. कोल्हे हे भाजपचे प्रदेश संयोजक आमदार श्रीकांत भारतीय यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि श्री. भारतीय यांच्यासोबत साधारणतः ३० वर्ष ते भाजपच्या प्रत्येक आघाडीवर कार्यरत राहिले आहेत. १९९६ साली माढा तालुका भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदावर ते कार्यरत होते. त्यानंतर, युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. १९९८ साली त्यांनी युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदाची व पुढे प्रदेश उपाध्यक्षपदी पदाचीही धुरा त्यांनी सांभाळली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास, तालुका स्तरापासून राज्यस्तरापर्यंत झाला आहे.
महाराष्ट्र स्टेट टीचर एज्युकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदावर ते सलग तेरा वर्षे कार्यरत आहेत. शिक्षक आघाडीच्या प्रदेश सहसंयोजक पदावर गेली तीन वर्ष ते काम करीत आहेत. त्यांची आजवरची निष्ठा, संघटनेतील योगदान आणि सतत कार्यरत राहण्याची वृत्ती लक्षात घेऊन, पक्षाने आता त्यांची प्रदेश संयोजकपदी निवड केली आहे.
कोण आहेत डॉ. कोल्हे ?
सहावा वेतन आयोग लागू होत असताना, कनिष्ठ महाविद्यालयाप्रमाणे अध्यापक विद्यालयांची वेतन श्रेणी निश्चित करून घेण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. २००० साली राज्यात नॅशनल कौन्सिल टीचर एज्युकेशनचे नियम लागू झाले. यावेळी, अध्यापक विद्यालयात नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या सेवा सातत्याबद्दल प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी, डॉ. कोल्हे यांनी सतत पाठपुरावा करून राज्यातील १८५ प्राध्यापकांना सेवा सातत्य मिळवून दिले होते. त्याचबरोबर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात एम. एड. करण्यासाठी अध्यापक महाविद्यालयांसाठीचा असणारा कोठा वाढवून घेतला होता. अध्यापक विद्यालयात राबविल्या जाणाऱ्या आंतरवासिता उपक्रमाची सुलभता वाढविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे, शासनाचा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत झाली होती. २०१० साली दिल्लीच्या नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनने देशभरातील अध्यापक विद्यालयांसाठी निरीक्षण समिती स्थापन केली. या समितीत निवड होणारे देशभरातील अध्यापक विद्यालयातील डॉ. कोल्हे हे एकमेव सदस्य होते. शिक्षण शास्त्र व इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त असणारे डॉ. कोल्हे यांनी आपत्ती व्यवस्थापनात पी.एच.डी. पदवी प्राप्त केली आहे.
त्यांच्या कुटुंबात तीन पिढ्यात शिक्षकी पेशाची परंपरा आहे. गेल्या दोन पिढ्यात शैक्षणिक चळवळीत या कुटुंबाचे योगदान राहिले आहे.
प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, आ. श्रीकांत भारतीय यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. पक्षीय राजकारणात पडद्यामागे त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पक्ष वाढीसाठी आमदार भारतीय यांच्यासोबत त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राम सातपुते यांची उमेदवारी आणि विजयात आमदार भारतीय यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य के. के. पाटील यांच्या साथीने त्यांनी दिलेले योगदान खूप महत्त्वपूर्ण राहिले आहे. त्याचबरोबर अक्कलकोट आणि पंढरपूर, मंगळवेढ्याच्या पोटनिवडणूकित पडद्यामागची त्यांची भूमिका महत्त्वाची होती.
या सर्व बाबींचा विचार करून पक्षाने आता त्यांची शिक्षक आघाडीच्या प्रदेश संयोजक पदी निवड केली आहे. या निवडीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार राम सातपुते, भाजपचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य के. के. पाटील आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Very informative and funny! For further reading, check out: DISCOVER HERE. What’s your take?