श्री संत सावतामाळी देवस्थान ट्रस्ट, माळशिरस चुरशीची व रंगतदार निवडणूक…

श्री संत सावता माळी देवस्थान ट्रस्टचे चार संचालक बिनविरोध तर तीन संचालक पदासाठी सात उमेदवार रिंगणात…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथे श्री संत सावता माळी देवस्थान ट्रस्ट या ट्रस्टची पंचवार्षिक निवडणूक सन 2024-29 जाहीर झालेली आहे. सदरच्या ट्रस्टमध्ये एकूण सात संचालक पदे आहेत. त्यामध्ये तीन संचालक यांच्यामध्ये निवडणूक लागलेली आहे. तीन संचालकांमध्ये सात उमेदवार उभे राहिलेले आहेत तर, चार संचालक बिनविरोध निवडून आलेले आहेत. सदरची निवडणूक मंगळवार दि. ०३/०९/२०२४ रोजी स. ८ ते दु. ४ या वेळेमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
श्री संत सावता माळी देवस्थान ट्रस्ट, माळशिरस यामध्ये मस्के गट पिसे यांचे दोन गट, शिंदे गट, जमदाडे गट, बोराटे गट व इतर आडनाव असलेले सर्व मिळून एक गट असे सात गट आहेत. त्यापैकी मस्के गट अनिल नारायण मस्के, पिसे गट 2 गोपाळ गणू पिसे, शिंदे गट भगवान सुबराव शिंदे, जमदाडे गट शिरीष ज्ञानेश्वर जमदाडे असे चार संचालक बिनविरोध झालेले आहेत. तर पिसे गट एक मध्ये निवडणूक राजाभाऊ लक्ष्मण पिसे – रेल्वे, मानसिंग जगन्नाथ पिसे – विमान, बोराटे गटामध्ये नागनाथ पिलाजी बोराटे- रेल्वे, महेश नवनाथ बोराटे – विमान, इतर गटांमध्ये दत्तात्रय सदाशिव आदट – रेल्वे, विष्णुपंत शंकर केमकर – विमान, डॉ. संजय गोरे – जीप असे सदस्य संचालक पदासाठी उभा राहिलेले आहेत. पिसे गटाचे 160 मतदान, बोराटे गटाचे 70 मतदान, इतर गट 225 मतदार आहेत. विशेष म्हणजे पिसे मतदारांनी पिसे उमेदवारांना मतदान, बोराटे मतदारांनी बोराटे उमेदवारांना मतदान तर इतर गट यांनी इतर गटातील उमेदवारांना मतदान अशी मतदानाची प्रक्रिया ठरलेली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची व रंगतदार होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.