ताज्या बातम्याराजकारण

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची “भाकरी” फिरवण्याच्या नादात मोहिते पाटलांचा “तवा” च फिरला…

भारतीय जनता पक्षाच्या चुलीवर तवा पुन्हा मांडणार का, अन्य पक्षाच्या चुलीवर किंवा स्वतःची चूल तयार करणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिलेले आहे…

माळशिरस (बारामती झटका)

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांना लोकसभेची पुनश्च उमेदवारी मिळू नये, यासाठी मोहिते पाटील परिवारातील तीन पिढ्या एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय व राज्यातील नेतृत्व यांना भेटलेले होते. तरीसुद्धा माढा लोकसभा मतदार संघातील प्रलंबित विकासकामे करून भारतीय जनता पक्षाचे तळागाळात काम पोचविण्याचे कार्य विद्यमान कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेले असल्याने माढा लोकसभेची पुनश्च उमेदवारी मिळालेली आहे. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची “भाकरी” फिरविण्याच्या नादात मोहिते पाटील यांचा “तवा” च फिरला, अशी अवस्था झालेली असल्याने मोहिते पाटील परिवार भारतीय जनता पक्षाच्या राजकीय चुलीवर तवा पुन्हा मांडणार का, अन्य पक्षाच्या चुलीवर किंवा स्वतःची चूल तयार करणार याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोहिते पाटील परिवार यांच्या तीन पिढ्यांनी शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तीन पक्षांमध्ये विविध पदावर काम केलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सोलापूर जिल्ह्यातील अजित ब्रिगेड यांच्या अनुयायांना कंटाळून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. लोकसभेच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पक्षात विनाअट प्रवेश केलेला होता. कृष्णा-भिमा स्थिरीकरणाचा मुद्दा ऐरणीवर होता.

काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने प्रश्न जाणीवपूर्वक रखडत ठेवला असल्याचा आरोप प्रत्यारोप अनेकवेळा भाषणातून, सोशल मीडियातून केलेला होता. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेला लवादाची अडचण येत असल्याने सदरचा प्रकल्प प्रलंबित होता. यासाठी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय जलमंत्रालय विभागाकडे कृष्णा फ्लड डायव्हर्शन योजनेचे प्रपोजल दाखल करून सदरच्या सिंचनाचा प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू केलेले होते. बऱ्यापैकी मार्ग सुकर झालेला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात अनेक दिवसांपासून रखडलेले सिंचनाचे, रस्त्याचे, रेल्वेचे प्रकल्प मंजूर करण्याकरता खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय व राज्यातील नेतृत्व यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत. काही प्रश्न मार्गी लागण्याच्या स्थितीमध्ये आहेत. असे सर्व असताना मोहिते पाटील व समर्थक यांचेकडून कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचे काम समाज माध्यम व सोशल मीडियावर सुरू होते. उमेदवारीचा पत्ताच नाही, तोपर्यंत धैर्यशील मोहिते पाटील यांनी खासदारच असे डिजिटल झळकवलेले होते.

भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात मोहिते पाटील यांची वर्तणूक सुरू होती. माढा लोकसभेची उमेदवारी मोहिते पाटील यांना मिळणार नाही, अशी विरोधी गटातून चर्चा सुरू होती. तर मोहिते पाटील समर्थक यांच्या मधून फिक्स उमेदवारी अशी सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी मंत्रिमंडळात सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मोहिते पाटील परिवारांच्या पायाखालची वाळू सरकलेली होती‌. अशा कठीण परिस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्याने श्री शंकर सहकारी साखर कारखान्याला आर्थिक मदत करण्यात आलेली होती‌. तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ व राज्यातील नेत्यांवर चिखलफेक व टीकाटिप्पणी सुरू होती.

महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी भारतीय जनता पक्षाकडून जाहीर झालेली आहे. त्यामध्ये माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च उमेदवारी मिळालेली आहे. मोहिते पाटील समर्थक यांचा ताबा सुटलेला आहे. माढा आणि पाडा, असे समीकरण समाज माध्यमातून सुरू आहे. मोहिते पाटील परिवार देशाचे नेते शरदचंद्रजी पवार व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळालेली नसल्याने मोहिते पाटील परिवार कोणती भूमिका घेतील, याकडे लक्ष लागून राहिलेले आहे. मोहिते पाटील यांचा राजकीय “तवा” च फिरलेला असल्याने भारतीय जनता पक्षाच्या चुलीवर पुन्हा तवा मांडणार का, अन्य पक्षाच्या चुलीवर किंवा स्वतःची चूल तयार करणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी शरदचंद्रजी पवार, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या बॅनरवर धैर्यशील मोहिते पाटील यांचा फोटो टाकून आता खासदार कोण हे जनता ठरवेल, असे सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोहिते पाटील परिवार निर्णय घेऊ शकणार नाहीत, अशीही चर्चा सुरू आहे. शेवटी राजकारण असते, त्यामुळे मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort