Uncategorized

भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष पदात जुन्याना न्याय देणार ?

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यात पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीची ताकद राहिली आहे. सध्या माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार व या माढा मतदार संघात भाजपाचा खासदार आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये या तालुक्यात पहिल्यापासूनच अँड सुभाष पाटील अँड संजीवनी ताई पाटील के के पाटील सोपान नारनवर बाळासाहेब सरगर बाळासाहेब वावरे विठ्ठल शिंदे सदाशिव शेटे हनुमान धालपे आदीनी आतापर्यंत काम चालू ठेवले आहे त्यामुळेच तालुक्यात भारतीय जनता पार्टी टिकून आहे. सोलापूर जिल्हा पश्चिम भाजपाची नुकतीच जिल्हा कार्यकरणी जाहीर झाली आहे. त्या मध्ये माळशिरस तालुक्याचे तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली असून या तालुक्यात भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष हे पद रिक्त आहे. तालुक्यात जुना भाजप गट व नवीन मोहिते-पाटील गट असे दोन गट नेहमीच अग्रेसर आहेत. मागील वेळी मोहिते-पाटील गटाला तालुकाध्यक्ष पद मिळाले होते तर संघटन सरचिटणीस हे पद जुन्या भाजप गटाकडे होते. परंतू आता तरी नुतन जिल्हाध्यक्ष चेतनसिह केदार जुन्या गटाला न्याय देणार का ? असा प्रश्न तालुक्यात चर्चाचा विषय बनला आहे. जुन्या गटातून सलग दोन वेळेस संघटन सरचिटणीस राहिलेले संजय देशमुख यांचे तर मोहिते-पाटील गटातून अकलूज मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष मामासाहेब पांढरे यांचे नाव आघाडीवर आहे. भारतीय जनता पक्षात संघटन सरचिटणीस हेच तालुकाध्यक्ष पदासाठी दावेदार असतात परंतू नुतन जिल्हाध्यक्ष चेतनसिह केदार हे कशाचा निकष लावतात हे जाहीर झाल्यानंतरच लक्षात येईल. भाजप हा निष्ठावंत न्याय देणारा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक अभियानास जुना भारतीय जनता पार्टीचा गट नेहमीच सक्रिय राहत असतो त्यामध्ये टिफिन बैठक ज्येष्ठांचा सन्मान परवा मिरी माटी मेरा देश अभियान घर चलो अभियान आधी मध्ये जुना गट नेहमीच सक्रिय राहिला.

 आगामी लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती आदी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करावे लागणार आहे. भारतीय जनता पार्टी मध्ये तालुकाध्यक्ष पद हे महत्त्वाचे मानलेजाते.तालुक्यातील बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख पन्ना प्रमुख अशी अनेक कामे पार्टी देत असते. ती कामे तालुका स्तरावर करावी लागतात. यावरूनच जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार माळशिरस तालुक्यात जुन्या भाजपला न्याय देणार की नवीन ला जवळ करणार हे येणारा काळच ठरवेल.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..

Related Articles

Leave a Reply

Back to top button