भारत जोडो यात्रेला डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते अकोल्यात सहभागी होणार.
प्रतापगडावरून स्व. राजीव गांधी, सहकार महर्षी व लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांना अभिवादन करून कार्यकर्ते रवाना होणार.
अकलूज ( बारामती झटका )
काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते अकोला येथे सामील होण्याकरिता बुधवार दि. 16/11/2022 रोजी सकाळी नऊ वाजता भारत देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी, माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांना अभिवादन करून सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष युवा नेते डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापगडावरून कार्यकर्ते भारत जोडो यात्रेस मार्गक्रमण करणार आहे.

भारत जोडो यात्रेसाठी माळशिरस तालुक्यात दोन लक्झरी बस व दहा ते बारा चार चाकी वाहनांमधून 200 ते 250 नेते व कार्यकर्ते अकोला येथे जाणार असून दि. 17/11/2022 रोजी भारत जोडो यात्रेत सामील होणार आहेत, अशी माहिती माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सतीश नाना पालकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
