कृषिवार्ताताज्या बातम्याराजकारण

भारत राष्ट्र समितीच्या (BRS) सोलापूर जिल्हा समन्वयक पदी ज्ञानेश्वर (माऊली) जवळेकर यांची निवड

पंढरपूर (बारामती झटका)

बळीराजा शेतकरी संघटनेमध्ये सक्रिय काम करणारे व आक्रमक व्यक्तिमत्त्व असलेले ज्ञानेश्वर जवळेकर यांची भारत राष्ट्र समितीच्या सोलापूर जिल्हा समन्वयक पदी निवड करण्यात आलेली आहे. या आधी ते बळीराजा शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी काम करत होते. गेले १० ते १२ वर्ष ते शेतकरी संघटनेत काम करत आहेत.

शेतकऱ्यांविषयी प्रचंड तळमळ असलेले ज्ञानेश्वर जवळेकर यांनी आतापर्यंत रस्त्यावर उतरून अनेकदा शेतकऱ्यांसाठी आंदोलने केली आहेत. स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांची जाण असणाऱ्या नेतृत्वाला आज शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या भारत राष्ट्र समितीमध्ये काम करायची संधी मिळाली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button