भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने खुडूसच्या लाभार्थ्याचा प्रजासत्ताक दिनी आत्मदनाचा इशारा
माळशिरस (बारामती झटका)
खुडूस ता. माळशिरस येथील शेतकरी भगवान सोनाजी बनकर यांनी भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने येत्या २६ जानेवारी ला आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला असून याबाबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी अकलूज यांना दिले आहे. खुडूस येथील शेतकरी भगवान बनकर यांच्या जमिनीपैकी काही क्षेत्र आळंदी-पंढरपूर पालखी मार्गामध्ये गेले आहे. तसेच दुकानाचे शेड, राहते घर गेले आहे. याबाबत त्यांनी समक्ष अर्ज दिल्यानंतर खुडूसचे सर्कल व तलाठी यांनी समक्ष येऊन गट ४३८ व ४३९ ची मालमत्ता किती याचा पंचनामाहि केला. कार्यालयाने निवाडाही प्रसिद्ध केला. परंतु कार्यालयाने ४३९ च्या मालमत्तेची नुकसान भरपाई गट नं. ४३८ च्या मालकाला अदा केली. हि बाब निदर्शनाला आणून दिली आहे.
परंतु अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही व अद्यापपर्यंत हेलपाटे मारूनही मला नुकसान भरपाई मिळाली नाही. सदरची नुकसान भरपाई २६ जानेवारी पर्यंत न दिल्यास आमचे कुटुंब आत्मदहन करणार असल्याचा इशारा भगवान बनकर यांनी निवेदनात दिला आहे. या निवेदनाच्या प्रति ना. केंद्रीय सडक व परिवहन मंत्री नितिन गडकरी, आयुक्त जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या सहसंबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
नुकसान भरपाईसाठी गेले दोन वर्षापासून पाठपुरावा करीत आहे परंतु, याबाबत संबंधित अधिकारी कसलीही दखल घेत नाहीत. टाळाटाळ केली जाते, बघतो, करतो अशी उत्तरे दिली जात आहेत. यासाठी मला हा मार्ग स्वीकारावा लागत आहे, याची सर्व जबाबदारी शासनाची राहील. – भगवान बनकर, खुडूस
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I enjoyed the humor in this article! For more, click here: LEARN MORE. Let’s discuss!
Muchas gracias. ?Como puedo iniciar sesion?