मका लष्करी अळी व त्यावरील एकात्मिक नियंत्रण – सतिश कचरे मंडळ कृषि अधिकारी
नातेपुते (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यात मका पिकाखील सर्वसाधारण क्षेत्र ६३४५ हे. क्षेत्र असून आतापर्यंत ५४८४ हे. क्षेत्रावर पेरा पूर्ण झाला असून तो वाढत आहे. अलिकडे इतर खरिप व रब्बी पीकाचे क्षेत्र मका पिकाखाली वर्ग होत आहे. त्याचे कारण म्हणजे हमी भाव, मका खरेदी केंद्रे, ग्रेन बेस अल्कोहोल फॅक्टरी खरेदी व मागणी, वाढलेले पशुधन, पोल्ट्री व औद्योगीक उपयोग (स्टार्च ) व कमी कालावधीचे पीक, संकरीत जाती हे होय. मका सी -४ वर्गातील पीक असल्यामुळे चिबड जमिनी सोडता सर्व जमिनीत मशागत, पाणी व एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापना चांगला प्रतिसाद देऊन ते अपेक्षीत उत्पादनात रुपांतर करते. मका पिकाचे सर्व पीक भाग उदा. ताट, कणसे, बुरुकुंडे, मुळे सर्व उपयोगात येतात. म्हणून त्याला कल्पपीक संबोधले तर वावगे होणार नाही. ५. मुरघास घास बनविण्यात यांचा ८०% वाटा असलेमुळे चाऱ्याचा मोठा वाटा आहे. मनुष्य, प्राणी, पशुधन, पक्षी, यांना अन्नाचा विचार करता प्रथीने, कार्बोदके, तंतुमय पदार्थ, साखर, सिग्ध पदार्थ. ६ प्रकारची व्हिटॅमिन्स, ७ प्रकारची सुक्ष्म अन्नद्रव्ये ( पशुधन, मनुष्य, पोल्ट्री उपयुक्त ) ही सर्व संतुलीत प्रमाणात उपलब्ध आहेत. यामुळे लघवीचे विकार, किडणी स्वछता व कार्यक्षमता व प्रतिकार शक्ती वाढविणे, कॅन्सर प्रतिबंध, मधूमेह निवारण, पोट साफ होणे, कॉल्सेटेरॉल कमी करणे, रक्तक्षय रोखणारे, डोळे व कातडीचे काळजी करणारे, प्रतिकार शक्ती वाढविणारे, हृदयाची काळजी करणारे अन्नधान्य पीक आहे.
अशा या उपयुक्त पीकाला सन २०१७ – १८ पासून ७०% पर्यंत नुकसान करणाऱ्या लष्करी अळीने वेढा घातला आहे. म्हणून या किडीचे एकात्मिक व्यवस्थापन बाबतउपाय योजने क्रमप्राप्त आहे ते आपण पाहूयात.
जीवन क्रम – १. या अळीचा पतंग पोग्याजवळ पानाचे वर व खाली १००० पर्यत अंडी पिवळी. गुलाब सर घातली जातात. त्याचे आयुष्य २ -३ दिवस असते. २. या अंड्यातून उबवून अळ्या बाहेर पडतात. त्याचे ६ वाढीच्या अवस्था असून डोक्यावर Y आकार व शेपटीवर ४ ठिपके ही ओळख व त्या १४-१९ दिवस राहून सर्वात जास्त नुकसान या आवस्थेत करातात. ३. पूर्ण वाढ झालेल्या आळ्या कोषावस्थेत जमिनित ४-५ सेंमी खोल जाऊन कोषावस्थेत जातात. अशाप्रकारे ही कीडी २६-३५ दिवसात जीवनक्रम पूर्ण करते. म्हणजे मका पीकात ३ वेळा जीवनक्रम पूर्ण व अंड्याची संख्या यामुळे उपद्रव खुप मोठा व नुकसान टक्केवारी ही खुप मोठी असते.
उपद्रव – अंड्यातून २ ते ३ दिवसात बाहेर आलेल्या अळ्या अन्नाच्या शोधात विखरून पाने खरडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे लांबट चट्टे दिसून येतात. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला तर पानावर फक्त शिरा दिसतात. तिसर्या अवस्थेत अळी पोग्यात शिरून पाने खाते. त्यामुळे पानावर छिद्र दिसतात व पोग्यात मोठ्या विष्ठा दिसते. कणीस आवस्थेत ही अळी दाण्यावर उपजीवीका करते. अळी एवढी हुशार असते की, एका ताटावरून दुसऱ्या ताटावर जाणेसाठी लाळ सोडून तार करते व त्यावरून दुसऱ्या पिकावर हल्ला करते. क्षेत्र /शेत निरीक्षण – शेतात w आकाराचे निरीक्षण करून प्रत्येक ओळीत ५ प्रमाणे २० रोपे व त्यावरी अंडी अळी व त्यांचे प्रादुर्भाव टक्केवारी नोंद खालील प्रमाणे करावी – १ -२ झाडे प्रार्दुभाव ग्रस्त असतील तर -१०% नुकसान पातळी. २ – उंगवणीनतर २ आठवडे रोप ते पोगा अवस्था – कामगंध सापळे – ३ पंतग – ५% प्रादुर्भाव. ३ – उगवणीनंतर ४ आठवडे पोगा ते मध्य पोगा अवस्था – ५ ते १०% प्रादुर्भावग्रस्त . ४- ४ ते ७ आठवडे पोगा ते उशिर पोगा १० ते २० % प्रार्द्रूभाव असेल ५ – उशिरा पोगा ७ – आठवडे नंतर २० % प्रादुर्भाव ग्रस्त असेल ८ – तुरा ते पीक काढणी -१० % कणसे असतील तर लगेच उपचारात्मक उपाय योजावेत.
किडीचे एकात्मीक व्यवस्थापन – १ प्रतिबंधात्मक – १ उन्हाळी हंगामात दिवसा खोल नांगरट करणे . २ – फेरपालटमध्ये भूईमुग सुर्यफुल पीकाचा समावेश करावा . ३ – वेळेवर पेरणी करावी शक्यतो उशिराची पेरणी टाळावी . ४ – मका पीकाच्या बाजूने नेपीअर ग्रास या सापळा पीक व भोवती मटकी, उडीद या पीकाची लागवड करावी . ५ – एकरी १० पक्षी थांबे लावावेत . ६ – स्पोडोपटेरा ल्युर्सचे हेक्टरी १५ कामगंध सापळे नर किटक आकर्षण मास ट्रॅपीग व प्रादुर्भाव पातळीसाठी लावावेत . ८- हेक्टरी -१ या प्रमाणे पंतग पकडणेसाठी प्रकाश सापळे लावावेत. यामुळे किडीचे ९०% नियंत्रण होते.
उपचारात्मक उपाय – किडीचा ऑटब्रेक झाला व वरील प्रमाणे नुकसान टक्केवारी दिसून आले तर खालील उपाय करावेत – १- पोग्यात अळ्या दिसून आल्या तर माती + चुना ९:१ प्रमाणात मिश्रण टाकावे. २ – मेटेऱ्हायसिम अॅनीसोपली ५ ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी. ३ – १५०० पीपीएम निमार्क अंडी व अळ्या नाशक फवारणी करावी, यामुळे अंडी नपुसक होऊन अळी भुक मंदाऊन मरते. प्रथमतः हाय प्रोफाईल किटकनाशके वापरू नयेत. सरतेशेवटी अळीसाठी ४ – इमामेकटीन बेंझोएंट २ मिली प्रति लिटर फवारणी करावी. वरील सर्व कमी खर्चीक अळीचा प्रार्दुभाव कमी व प्रतिबंध करून हवा, पाणी, मनुष्य, प्राणी, पक्षी वातावरण पर्यावरण यांचेशी मैत्रीचे संबंध ठेवून आपण एकात्मिक व समुळ उच्चाटन करणे शक्य आहे. त्यासाठी नियमित निरीक्षणे प्रादुर्भाव टक्केवारी आकलन करणे गरजेचे आहे. याप्रमाणे प्रतिबंधात्मक व निरीक्षणे आधारीत उपचारात्मक ९०% नियंत्रण कमी खर्चाचे करण्याचे आवाहन मंडळ कृषि अधिकारी नातेपुते (ISO 9001: 2015 ) यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng