Uncategorizedताज्या बातम्या

मदत करणाऱ्यांचा आदिनाथच्या संचालक मंडळाला विसर…

शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केली खंत…

करमाळा (बारामती झटका)

बारामतीच्या तावडीतून आदिनाथ सहकारी साखर कारखाना सोडवण्यासाठी मदत करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचा अभिनंदनचा ठराव न घेता आदिनाथ कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू केली. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी खंत व्यक्त करून माईकचा ताबा घेतला. आदिनाथ कारखान्याला मदत करणाऱ्यांचा आधी अभिनंदन ठराव मांडला व सर्व सभासदांनी मोठ्या टाळ्यांच्या गजरात मंजूर केला.

यावेळी बोलताना चिवटे म्हणाले की,महाराष्ट्रातील सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला. शिवाय ना. तानाजी सावंत यांनी स्वतःच्या खिशातले बारा कोटी रुपये आदिनाथ कारखान्याच्या खात्यात भरून आदिनाथ कारखान्यावरील जप्तीची कारवाई थांबवली. खऱ्या अर्थाने सार्वजनिक आरोग्य मंत्री सावंत यांचा अभिनंदनचा ठराव सभेच्या सुरुवातीलाच घेणे क्रम प्राप्त होते, ठराव घेणे गरजेचे होते, यामुळे मी नाईलाजाने ठराव सभा थांबून मांडला.

सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आदिनाथ कारखाना सहकाराच्या मालकीचा राहावा यासाठी ही आर्थिक मदत केलेली आहे. याची जाणीव संचालक मंडळींनी ठेवून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आता आदिनाथमध्ये राजकारण आणू नये. इथून पुढे मंत्री तानाजीराव सावंत सांगतील त्या पद्धतीनेच संचालक मंडळाने कारभार करावा त्यांना अंधारात ठेवून कुठलेही काम करू नये‌. येणाऱ्या काळातील आमदार कोण ? यावर आज वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेली चर्चा वायफळ होती. अशी चर्चा आदिनाथ व्यासपीठावरून होणे गरजेचे नाही. आदिनाथचे व्यासपीठ राजकारण विरहित असले तरच आदिनाथचा बचाव होणार आहे.

बारामतीच्या तावडीतून आदिनाथ कारखाना सोडवण्यासाठी करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी बचाव समिती निर्माण केली. या बचाव समितीने सहा महिने संघर्ष केला. त्यावेळी पवारांच्या विरोधात रस्त्यावर येण्यासाठी तालुक्यातले सगळे गट तट गपचूप बिळात जाऊन बसले होते, याचीही जाणीव सगळ्या सभासदांना आहे.

शेवटी आदिनाथ महाराज जागृत असून आदिनाथ महाराजांच्या कृपेने सर्वांना योग्य ती कामे करण्याचे आदेश नियतीने दिले व कार्य सिद्धी झाली व राज्यात सत्तांतर झाले यामुळेच हा कारखाना पुन्हा सभासदांच्या मालकीचा झाला आहे.या सर्व यशाचे श्रेय सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आहे.

आमदार पदाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री तानाजीराव सावंत हे बसून घेतील व या दोन्ही नेत्यांचा शब्द पाळण्याचे संकेत बागल व नारायण आबा यांना दिलेले आहेत. यामुळे आदिनाथचा कारभार करताना राजकीय चर्चा होऊ नये, अशी अपेक्षा शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी यावेळी व्यक्त केली नाही.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button