मन हेलवणारी, अतिशय मनाला चटका देणारी, वास्तववादी घटना, यासाठी आमदार, खासदार, मंत्री यांनी उपायोजना करावी…
नातेपुते (बारामती झटका)
मराठा महासंघ नातेपुते या व्हाट्सअप ग्रुपवरील व्हिडिओ पाहिल्यानंतर मन हेलावणारी, अतिशय मनाला चटका देणारी, वास्तववादी घटना पाहिल्यानंतर लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री यांनी प्रत्येकाच्या मतदार संघात व कार्यक्षेत्रात उपायोजना करावी. समाजातील प्रत्येक व्यक्तीने अन्नाचे महत्त्व ओळखावे, असा व्हिडिओ ग्रुपवर आल्यानंतर ग्रुपमधील असणाऱ्या लोकांची इच्छा झाली, बारामती झटका यांनी समाजासमोर वास्तव येण्याकरता बातमी करावी, असा व्हिडिओ पाहिल्यानंतर मानसिकता झालेली आहे.
आई आणि मुलगी परिस्थिती गरिबीची असल्याने खायला अन्न नाही, मुलगी भुकेने व्याकुळ झालेली आहे, परंतु आईचा नाइलाज असल्याने मुलीच्या भूकेकडे दुर्लक्ष करते. मुलगी जवळच पडलेला कागद खात असते आणि तो तुकडा घशामध्ये अडकत असतो. कागदाचा तुकडा पोटातही जात नाही आणि बाहेरही येत नाही, अशा परिस्थितीत आई कसेबसे करून तुकडा बाहेर काढते. त्यावेळेस आई मुलीला विचारते तो कागद का खाल्ला ? त्यावेळेस मुलगी म्हणते, त्या कागदावर चपातीचे चित्र होते म्हणून कागद खाल्ला.
मन हेलावणारी, अतिशय मनाला चटका देणारी, वास्तवादी घटना एका सामाजिक कार्यकर्त्याने सोशल मीडियावर जनतेसमोर मांडलेली आहे. त्यांनीच मांडलेली व्यथा समाज माध्यम म्हणून बारामती झटका त्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng