मोका अंतर्गत सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद, गृह विभागाच्या टोळीचा मुकादम रडारवर…

डीवायएसपी श्री. संतोष वाळके व पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या उल्लेखनीय धाडसी व दमदार कामगिरीचे स्वागत केले जात आहे…
विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली…
अकलूज (बारामती झटका)
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी ,सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संतोष वाळके, अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. निरज उबाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या सहकार्याने अकलूज येथील सराईत 13 गुन्हेगारांविरुद्ध मोका कायद्यान्वये केलेल्या कारवाईचे उल्लेखनीय धाडसी व दमदार कामगिरीचे कौतुक केले जात आहे. मोक्का अंतर्गत सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद झाली. मात्र, टोळीचा मुकादम कोण आहे, यासाठी गृह विभागाच्या मोका टोळीचा मुकादम रडारवर असल्याची विश्वासनीय व गोपनीय गृह विभागाच्या सूत्रांकडून माहिती समोर येत आहे..
मोका अंतर्गत घडलेल्या घटनेची माहिती अशी,
अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी सराईत गुन्हेगार यांच्या विरोधात प्रस्ताव तयार करून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संतोष वाळके यांच्या सहीने सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या शिफारशीसह प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी यांच्याकडे पाठवलेला होता. सदरच्या प्रस्तावामध्ये सदर गुन्हेगार टोळीतील आरोपीविरुद्ध संघटितरित्या एकत्र येऊन केलेले गुन्हे, गुन्हेगारी पार्श्वभूमी टोळीचे बेकायदेशीर कृत चालू ठेवणे, बेहिशोबी मालमत्ता बाळगणे, त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना अंकुश लावण्याच्या उद्देशाने या आरोपींना मोका कलम लावण्याबाबत प्रस्ताव सादर केलेला होता. सदरच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन गुन्ह्याचा पुढील तपास अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संतोष वाळके यांच्याकडे देण्यात आलेला आहे.
सदरच्या कामी सोलापूर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संजय जगताप, अकलूज पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे, पोलीस हवालदार अमोल बकाल, समीर पठाण, रियाज तांबोळी, हरीश भोसले यांनी सहकार्य केलेले होते.
सदर प्रस्तावाची पडताळणी व अवलोकन करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 कलम 23 (1)(आ) प्रमाणे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी अकलूज पोलीस स्टेशनचा प्रस्ताव ग्राह्य धरून सदरची कारवाई केलेली आहे.

माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच मोका अंतर्गत कारवाई झालेली असून प्रथम अकलूजमध्ये झालेली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संतोष वाळके व पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनी पदभार घेतल्यापासून अवैध व्यवसायांना चांगलाच आळा बसलेला आहे. गुन्हेगारी, गुंडगिरी, गुंडागर्दी करणाऱ्या गुंडांचे मोका अंतर्गत कारवाईमुळे धाबे दणाणलेले आहेत. यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणार असल्याने सर्वसामान्य व गोरगरीब जनतेमधून कार्यवाहीचे स्वागत केले जात आहे. माळशिरस तालुक्यात अशा गुंडांच्या किती टोळ्या कार्यरत आहेत, गुंडांचा मुकादम कोण आहे, याची पाळेमुळे शोधण्याचे गृह विभागाचे काम सुरू असल्याची गोपनीय माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कोणाचीही गुंडागर्दी, दहशत व दादागिरी चालू दिली जाणार नाही, असे समाज माध्यमांमधून जाहीरपणे वक्तव्य केलेले होते. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडेच गृह विभागाची जबाबदारी आहे. सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच नवीन मोका अंतर्गत कायद्यान्वये अकलूज उपविभागात धाडसी व उल्लेखनीय कामगिरी झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. गुंडगिरी करणाऱ्या टोळीचा मुकादमाच्या मुस्क्या आवळल्यानंतर गुंडगिरी व दहशतीचा प्रकार घडणार नाही. गृह विभागाने मुकादमा विरोधात उचललेल्या पावलाचे सर्वसामान्य व गोरगरीब पीडित जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



