Uncategorized

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल ‘या’ आठवड्यात लागण्याची शक्यता…

शिंदे गटाच्या आमदारांची अपात्रता, राज्य सरकारचा विश्वास दर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्ष निवडीची वैधता तीन निकालांची उत्सुकता…

मुंबई (बारामती झटका)

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल या आठवड्यात कोणत्याही दिवशी येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. शिंदे गटाच्या आमदारांची अपात्रता, राज्य सरकारचा विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्ष निवडीची वैधता या तीन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ काय निकाल देणार, याची उत्सुकता आहे.

एकीकडे शिंदे गट आणि भाजपने सरकार वाचावे म्हणून देव पाण्यात ठेवलेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतले राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि ठाकरे गटाने निकाल आपल्या बाजूनेच लागेल, असा दावा करताहेत.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरू होती. त्यात स्वतः सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांचा समावेश आहे.

न्यायमूर्ती एम. आर. शहा हे 15 मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे तत्पूर्वी हा निकाल येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, 20 मे पासून सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्याही सुरू होत आहेत. 20 मे ते 2 जुलै अशी सुप्रीम कोर्टाची सुट्टी असणार आहे. त्यामुळे या आठवड्यात कधीही निकाल लागण्याची शक्यता आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button