महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्ह्याची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा माळशिरस येथे होणार आहे.
डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा तालीम संघाच्या पदाधिकारी बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
माळशिरस ( बारामती झटका )
सोलापूर जिल्हा महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा 2022 सोलापूर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा तालीम संघाची मीटिंग प्रतापगड, धवलनगर येथे आयोजित करण्यात आली होती. सदर मीटिंगमध्ये 65 वी राज्यस्तरीय अजिंक्यपद अधिवेशन महाराष्ट्र केसरी किताब लढतीसाठी निवड चाचणी घेणे विषयी चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा ही माळशिरस तालुक्याला देण्यात यावी असा विषय, महाराष्ट्र केसरी छोटा राऊसाहेब मगर यांनी हा विषय मांडला. त्याला उपाध्यक्ष सर्जेराव चौरे यांनी अनुमोदन दिले व हा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

सदर मीटिंगसाठी सोलापूर जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी सचिव पै. भरत मेकाले, कार्याध्यक्ष वामनभाऊ उबाळे, छोटे रावसाहेब मगर, खजिनदार महादेव ठवरे माधव भंडारी, रामभाऊ बेणे, मारुती वाकडे, महेश कुलकर्णी, आप्पा साखरे, विलास कंडरे, बाबासाहेब माने, ज्ञानेश्वर पालवे, नारायण माने, उपस्थित होते.


हि स्पर्धा दिनांक 3 डिसेंबर व 4 डिसेंबर 2022 माळशिरस सर्टिफाइड. वजने सकाळी 9 ते 11 या वेळेत होतील, वजनाच्या वेळी सर्व खेळाडूंनी ओरिजनल आधार कार्ड, घेऊन येणे हे सर्व खेळाडूंना बंधनकारक आहे, अन्यथा वजन घेतले जाणार नाही.
स्पर्धेचे ठिकाण – माळशिरस सर्टिफाइड, माळशिरस.
आयोजक – बाबासाहेब माने उपसरपंच कण्हेर, किरण माने सरपंच मांडकी,
संपर्क – ज्ञानेश्वर पालवे (कामगार केसरी) 9975769950,
पै. नारायण माने (एन आय एस कुस्ती कोच ) 9890465662


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng