महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी दिनेश लोंढे यांची फेरनिवड

सातारा (बारामती झटका)
राज्यातील अग्रगण्य पत्रकार संघटना असलेल्या महाराष्ट्र पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी दिनेश लोंढे यांची नियुक्ती महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासरावजी कोळेकर यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली.
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दिनेश लोंढे हे महाराष्ट्र पत्रकार संघाचे कार्य गेले चार वर्षांपासून करत आहेत. त्यांनी महाराष्ट्र पत्रकार संघाचे कार्य सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोहोचवले असून निर्भीड पत्रकार म्हणून ते सातारा जिल्ह्यात ओळखले जातात.
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचे संघाच्या अनेक पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, सभासद, पत्रकार, हितचिंतक यांनी अभिनंदन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.