महाराष्ट्र मे एक ऐसा शेर है पिछले दिन राज्य मंत्रिमंडळ मे सहमती और दुसरे दिन केंद्र के बजेट मे मंजुरी – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव.
केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण-पंढरपूर व फलटण-बारामती रेल्वे मार्गासाठी 120 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला
दिल्ली ( बारामती झटका)
रेल्वे मंत्रालय के इतिहास में पहिली बार ऐसी ऐतिहासिक घटना घडी है, महाराष्ट्र राज्य सरकारने 31 जानेवारी 2023 को कॅबिनेट मंत्रिमंडळ मे फलटण-पंढरपूर रेल्वे को राज्य का 50% हिस्सा देने की सहमती दी और दुसरे दिन 01 फरवरीको केंद्र सरकार के अर्थसंकल्प रेल बजेट को माढा लोकसभा मतदारसंघके फलटण-पंढरपूर, फलटण-बारामती रेल्वे मार्ग को 120 कोटी रुपये निधी मंजूर हुआ की है. महाराष्ट्र मे एक ऐसा ही शेर है राज्य मंत्रिमंडळ में पहले दिन सहमती और दुसरे दिन केंद्र के बजेट में मंजूरी लायी है, उनका नाम है रणजीतसिंह नाईक निंबाळकर, ऐसा गौरवोद्गार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव इन्होंने खासदार के काम का गुणगौरव किया है. तब राज्यमंत्री रावसाहेब दानवे मौजुद थे.
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना माढा लोकसभेचे कार्यतत्पर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे, राज्यमार्ग, सिंचन योजना व इतर विकास कामांविषयी मंत्रालयामध्ये बैठक लावण्याची विनंती केलेली होती. सदरच्या विनंतीवरून कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी दि. 31 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता मंत्रालयात बैठक आयोजित करून 11 वाजता कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये अनेक विकासकामांना मंजुरी दिलेली होती. अनेक कामांच्या निधीची तरतूद करून अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारचा 50% खर्चाच्या निधीचे पत्र केंद्र सरकारला दिलेले होते. दुसऱ्याच दिवशी दि. 01 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्राचे अर्थसंकल्पीय बजेट होऊन त्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण-पंढरपूर व फलटण-बारामती रेल्वे मार्गासाठी 120 कोटी रुपये निधीची अर्थसंकल्पामध्ये मंजुरी दिलेली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्य सरकारने सहमती देऊन केंद्र सरकारने बजेटमध्ये दुसऱ्याच दिवशी निधी मंजूर करणे अशी घटना घडलेली असल्याने महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने एक सिंह आहे. पहिल्या दिवशी राज्य मंत्रिमंडळाची सहमती आणि दुसऱ्या दिवशी केंद्राच्या बजेटमध्ये निधीची तरतूद करणारे माढा लोकसभेचे कार्यतत्पर खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर आहेत, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुणगौरव केलेला असल्याने माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेच्या माना उंचावलेल्या आहेत. विशेष करून माळशिरस तालुक्यातून एक लाखापेक्षा जास्त लीड खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना दिलेले होते. फलटण-पंढरपूर व निरा-देवधर या दोन कामामुळे माळशिरस तालुक्यातील मतदारांच्या मताचा खऱ्या अर्थाने पुरेपूर उपयोग झालेला असल्याची भावना माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनता व मतदार यांच्यामधून होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This article really resonated with me. The points made were compelling. Id love to hear more opinions. Check out my profile for more!