महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते उपअभियंता अशोकराव रणनवरे यांचा सन्मान होणार.
माळशिरस पंचायत समितीतील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उप अभियंता अशोकराव आण्णासो रणनवरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त कार्यक्रम
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माढा लोकसभेचे माजी खासदार विकासरत्न श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते माळशिरस पंचायत समितीमध्ये कार्यरत असणारे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग माळशिरस उप अभियंता श्री. अशोकराव अण्णासो रणनवरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त बुधवार दि. ३०/११/२०२२ रोजी सकाळी ११ वा. पंचायत समिती माळशिरस येथे सेवानिवृत्ती समारोह कार्यक्रम संपन्न होणार आहे. सत्कार समारंभानंतर दुपारी १२ ते ४ या वेळेमध्ये सुमंगल कार्यालय, माळशिरस-अकलूज रोड येथे स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन माळशिरस पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.


माणकी ता. माळशिरस या गावचे प्रगतशील बागायतदार स्व. श्री. आण्णासो पांडुरंग रणनवरे उर्फ अण्णा दुकानदार यांना पाच मुले आणि चार मुली. माणकी गावच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक जडणघडणीत अण्णा दुकानदार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी माणकी गावचे दहा वर्ष सरपंच पद भूषविलेले आहे. त्यांच्या पश्चात नातू वस्ताद तानाजी रणनवरे सर यांनी सरपंच पद भूषवलेले आहे.

अण्णासाहेब यांचे सुपुत्र अशोकराव डिप्लोमा करून बांधकाम विभागात नोकरीस लागले, तर दोन बंधू शिक्षक व दोन बंधू शेती करीत आहेत.श्री. अशोकराव अण्णासो रणनवरे यांचा जन्म 01/121964 रोजी झाला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणकी येथे सुरू करून बिद्री ता. कागल येथे 1984 साली DCI सिविल डिप्लोमा पूर्ण केला. 1985 साली माळशिरस येथे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग येथे कनिष्ठ अभियंता पदावर कामास सुरुवात केली. 2008 ते 2014 या कालावधीत जिल्हा परिषद उपविभाग पंढरपूर येथे काम केले. 2014 ते 2018 या कालावधीत लघु पाटबंधारे उपविभागामध्ये शाखा अभियंता पदावर काम केले. 2018 ते 2021 या कालावधीत जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग माळशिरसमध्ये शाखा अभियंता पदावर कार्यरत होते. दि. 13/12/2021 रोजी उप अभियंता पदावर बढती मिळालेली होती. दि. 30/11/2022 रोजी सेवेचा कार्यकाल संपत असल्याने सेवानिवृत्त होत आहेत.
उपअभियंता अशोकराव रणनवरे यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. सुसंस्कृत स्वभाव, शुद्ध आचार विचार, नोकरी करीत असताना प्रशासन व लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य जनता यांचा ताळमेळ लावून त्यांनी आपल्या नोकरीचा कार्यकाल चांगल्या पद्धतीने घालवलेला आहे. जिल्हा परिषद सेवक व कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळलेली आहे. आई-वडिलांचे संस्कार, बंधूंचे सहकार्य व नोकरीच्या ठिकाणी कार्यालयातील नोकरवर्ग, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यामध्ये मिळून मिसळून आनंदाने, समाधानाने सेवा केलेली आहे.
सेवानिवृत्त निमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे माळशिरस पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने अवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng