महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन
श्रीपुर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रभाकर (भैय्या साहेब) देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुर येथे अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय सोलापूर यांच्या प्रशासकीय कार्यालया समोर जनहित शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन दिनांक 29/05/2023रोजी पासून चालु होणार आहे
सदर आंदोलन से संगम ता.माळशिरस येथील विद्युत सबस्टेशन 05/04/2023 सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गावाला वेठीस धरुन 33/11केव्हि उच्च दाब विद्युत वाहिनी फिडर बंद करण्यात आले होते त्या सबस्टेशनचे अधिकारी व गावातील समाजकंटक संजय महाडिक, दीपक महाडिक,समर्थ महाडिक, अक्षय महाडिक व प्रकाश महाडिक यांच्यावरती वर भारतीय दंड संहिता व विद्युत अधिनियम कायदा 2003 अन्वये घटनेच्या विविध कलमे लावुन गुन्हे दाखल करण्यासाठी महावितरण कंपनी चे उपविभागीय अधिकारी श्री दत्तात्रय भगवान ओमासे साहेब, वसंत जाधव साहेब, शशिकांत लोंढे साहेब, गोरख कर्चे साहेब या अधिकाऱ्यांवरती हि गुन्हे दाखल करण्यासाठी
गावातील तब्बल पन्नास नागरिक कांच्या सह्याचे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री.तुषार ठोंबरे साहेब यांना महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्र.भैय्या देशमुख यांच्या मार्गदर्शन खाली दिनांक 17/05/2023 रोजी विविध शासकीय दरबारी देण्यात आले होते या, जनहित शेतकरी संघटनेचे आकाश पराडे पाटिल, अमोल पराडे पाटील, प्रशांत पराडे पाटील,शिवराम गायकवाड आदि सभासद, पदाधिकारी उपस्थित होते. पण शासकीय दरबारी निवेदनाचा विचार न झाल्याने हे धरने आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्याची मुले आंदोलनाच्या पावित्र्यावर ठाम आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great mix of humor and insight! For more, click here: READ MORE. Let’s discuss!