महाराष्ट्र विधानभवन येथे विधानसभा व विधान परिषद सभागृहातील कामकाज पाहण्याची संधी मिळाली.

विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील व विधानसभेचे आमदार राम सातपुते यांनी सभागृहात विशेष निमंत्रित प्रवेशिका उपलब्ध करून दिली..
मुंबई (बारामती झटका)
मुंबई येथील महाराष्ट्र विधान भवन येथील विधानसभा व विधान परिषद सभागृहातील सभापती, उपसभापती, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, विविध राजकीय पक्षांचे आमदार यांचे सभागृहातील कामकाज पाहण्याची संधी विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांनी सभागृहात विशेष निमंत्रित प्रवेशिका बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेल संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मु. पो. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे.

महाराष्ट्र विधान भवन इमारतीचा उद्घाटन समारंभ पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या शुभहस्ते रविवार दि. 19 एप्रिल 1981 चैत्र 15 शके 1903 या दिवशी संपन्न झाला. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती श्री. रा. सु. गवई, महाराष्ट्र विधानसभा सभापती श्री. शरद शंकर दिघे यांची विशेष उपस्थिती होती. अशा भव्य दिव्य विधान भवनामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा व सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या निर्णयाचा समाज उपयोगी कामकाज सुरू असते.

श्रीनिवास कदम पाटील यांनी 2008 साली पाक्षिक साळुबाई वार्तापत्र सुरू केलेले होते. महिन्याच्या 01 व 15 तारखेला महिन्यातून दोनदा प्रकाशित केले जात होते. जनतेच्या मनामधील बातमीमुळे अल्पावधीत लोकप्रिय वृत्तपत्र ठरलेले होते, वाचकांचीही मोठ्या मागणी होती. पंधरा दिवस वाट पाहावी लागत आहे, यासाठी साप्ताहिक सुरू करून आठवड्यातून प्रकाशित करावे म्हणजे आठ दिवसातील घडामोडी वाचायला मिळतील, वाचकांच्या या आग्रहास्तव बारामती झटका 2009 साली साप्ताहिक सुरू केले. दर गुरुवारी बारामती झटका साप्ताहिक प्रकाशित केले जात होते. प्रत्येक गुरुवारी प्रकाशित होणाऱ्या बारामती झटका साप्ताहिक यामधून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, लोकप्रतिनिधी यांचे चुकीचे निर्णय, शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी चुकीचे वागणाऱ्या अधिकाऱ्यांचे ताशेरे ओढले जायचे. यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत होता. अशा अनेक कारणांमुळे बारामती झटका साप्ताहिक वाचकांच्या मनावर अधिराज्य करणारे साप्ताहिक ठरलेले होते. बदलत्या काळामध्ये वाचकांची अपेक्षा वाढलेली होती. काळानुसार बदल केला आणि बारामती झटका वेब पोर्टल ऑनलाइन सुरू केले. बारामती झटका वेब पोर्टल यांनी समाजामध्ये घडलेल्या घटनेची माहिती सोशल मीडिया, अँड्रॉइड मोबाईल, लॅपटॉप, कॅम्पुटर, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम अशा विविध साधनांमधून घडलेली घटना काही वेळामध्ये समाजात पोहोचविण्याचे काम केलेले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेब पोर्टल यांनी चांगले काम केले.
वाचकांची व सर्वसामान्य जनतेची अपेक्षा उंचावली. युट्युब चॅनेल काढण्याच्या जनतेकडून अपेक्षा व इच्छा व्यक्त झाल्या. त्यानुसार बारामती झटका यूट्यूब चॅनल सुरू केले. चित्रफिती मार्फत घडलेल्या घटनेचे दर्शन जनतेला व सर्वसामान्य नागरिकांना जिथे कुठे असतील, प्रवास, घर, शेतात, व्यवसायाच्या ठिकाणी अशा अनेक ठिकाणी घटनेची माहिती मिळत असल्याने अनेक लोकांनी बारामती झटका यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला आहे. थेट सभासद पन्नास हजार झालेले आहेत. वेब पोर्टल चे वाचन 1 कोटी 75 लाखाच्या वर गेलेले आहेत. तर युट्युब चॅनेल पाहणाऱ्या प्रेक्षकांची 93 लाख संख्या झालेली आहे.


पाक्षिक, साप्ताहिक, वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा आवाज व हक्काचे व्यासपीठ निर्माण करणारे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी महाराष्ट्र विधान भवन मधील कामकाजाची पाहणी केलेली आहे. सभागृहांमध्ये लोकप्रतिनिधी विषयाची मांडणी करीत असतात. विषय चुकीचा वाटला तर विरोध करतात. विषय चांगला वाटला तर बाके वाजवून स्वागत करतात. विधान भवन व विधान परिषद सभागृहामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचे आल्हादायक वातावरण, स्वच्छता शांतता, याचबरोबर लोकप्रतिनिधींची विषयाची पोट तिडकीने मांडणी असे अनेक मुद्दे पाहावयास व ऐकावयास मिळत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वोच्च सभागृह महाराष्ट्र विधान भवन आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करीत असताना संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना विधान परिषद व विधान सभा सभागृहातील कामकाज पाहण्याची संधी युवा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्यामुळे मिळालेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng