महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर राहील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगारदेखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषी, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक एकवर राहील, हा आमचा विश्वास आहे. त्यासाठी आपण सर्वजण शपथबद्ध होऊया आणि प्रयत्नशील राहू या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालय प्रांगणात ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे मुंबई येथील प्रमुख अधिकारी यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्याचा प्रमुख म्हणून सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम करता आले, याचे समाधानही आज माझ्या मनात आहे. या स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात आपल्याला आनंद निर्माण करता आला पाहिजे. तसेच समाजातील शेवटच्या घटकाला स्वातंत्र्य आणि विकास अनुभवता यावा, यासाठी गरजूंच्या वेदनेवर फुंकर घालता आली पाहिजे. तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत, असा शासनाचा मानस असून स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात झाले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I enjoyed the humor in this article! For more, click here: LEARN MORE. Let’s discuss!
Very well-written and funny! For more details, click here: EXPLORE NOW. Looking forward to everyone’s opinions!