महिलांना पुढे करून सुरू केलेली नौटंकी, उद्धव ठाकरेंनी थांबवावी…
आमदार संजय शिरसाट यांना करमाळा शिवसेनेचा पाठिंबा
करमाळा (बारामती झटका)
सुषमा अंधारे, प्रियंका चतुर्वेदी अशा राजकीय गद्दारी केलेल्या महिलांना पुढे करून संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांवर टीकाटिपणी करण्याची नौटंकी उद्धव ठाकरेंनी थांबवावी. अन्यथा, आमच्याकडील सुद्धा महिला खालच्या भाषेत टिकेला उत्तर देतील, असा इशारा करमाळा शिवसेनेने जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या उपस्थितीत आज तातडीची बैठक होऊन उद्धव ठाकरे यांचा निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख महेश चिवटे बोलत होते. या बैठकीसाठी उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, तालुकाप्रमुख देवानंद बागल, शहर प्रमुख संजय शीलवंत, युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, शहर प्रमुख विशाल गायकवाड, उपशहर प्रमुख नागेश गुरव, राजेश काळे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष प्रियंका गायकवाड आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सुषमा अंधारे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी अशी गद्दारी करून राष्ट्रवादीत गेली. राष्ट्रवादीचा सुपारी घेऊन प्रचार केल्यानंतर शरद पवारांशी गद्दारी करून आता उद्धव ठाकरे गटात आली आहे. जीने आयुष्यभर राजकारणात गद्दारी केली व धंदेवाईक राजकारण केले, अशा सुषमा अंधारे आता आपण किती ठाकरेचे निष्ठावान आहोत, हे दाखवण्यासाठी विनाकारण जाणीवपूर्वक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांवर खालच्या पातळीवर टीका करत आहेत.
दुसऱ्याला गद्दार म्हणताना आपण किती जणांशी गद्दारी केली, याचे आत्मपरीक्षण सुषमा अंधारे यांनी करणे गरजेचे आहे. ज्या बाईने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची टिंगल टवाळी केली. हिंदू देवतांचा उपमर्द केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. ब्राह्मण समाजाबद्दल असभ्य भाषा वापरली. अशी तत्त्व शून्य पैशासाठी भोंगा म्हणून कोणाच्या व्यासपीठावर जाऊन भाषण देणारी सुषमा अंधारे प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करत आहे.
दुसऱ्याला रेडा म्हणताना आपण कोण आहोत, याचासुद्धा विचार त्यांनी करणे गरजेचे आहे. काँग्रेसशी गद्दारी करून उद्धव गटात आलेले प्रियंका चतुर्वेदी तात्काळ खासदार झाल्या. त्यांना खासदार कशामुळे केले याचे उत्तर आदित्य ठाकरे यांनी देणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षी शिवसेनेत काम करणाऱ्यांना नेत्यांना डावलून प्रियंका चतुर्वेदी यांना खासदार करणे याचे गौडबंगाल काय आहे हे जाणण्याची जनतेला उत्सुकता आहे.
आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून ही ठाकरेंची प्रवृत्ती म्हणजे, मी नाही त्यातली कडी लाव आतली, असा प्रकार आहे.
विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर द्या, असे आदेश आम्हाला पक्ष कार्यालयातून आले असून आम्ही सुद्धा ग्रामीण भागातील तळागाळातील कार्यकर्ते जशास तसे उत्तर देणार, असल्याचे चिवटे यांनी सांगितले.
आ. संजय शिरसाट यांनी जशास तसे उत्तर देऊन खऱ्या अर्थाने आपण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिकच असल्याचे दाखवून दिल्याबद्दल संजय शिरसाट यांचा अभिनंदन ठराव घेण्यात आला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Jennifer Eunson