महिलांनी कुटुंबाबरोबरच स्वतःच्याही आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे – प्रा. सौ. मीनाक्षी जगदाळे
अकलूज (बारामती झटका)
आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने व उपजिल्हा रुग्णालय अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन व मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष शिवमती प्राध्यापक मीनाक्षी अमोल जगदाळे यांनी सोलापूर विभाग पंढरपूर यांच्यामार्फत करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महेश गुडे साहेब वैद्यकीय अधीक्षक श्रेणी एक, डॉ. सौ. सुप्रिया मदने वैद्यकीय अधिकारी, डॉ. रेश्मा देशमुख सरताळे आयुष अधिकारी, डॉ. श्रद्धा नरवणे दंतचिकित्सक आदींसह डॉ. श्रीरामचंद्र मोहिते तालुका आरोग्य अधिकारी श्रेणी एक व माळशिरस तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ, दिगंबर मिसाळ माळशिरस तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, सचिन पराडे माळशिरस तालुका उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, अमोल शिवाजी जगदाळे उपस्थित होते.
यावेळी आरोग्य विभागातील सर्वांचा तसेच सर्व परिचारिकांचा महापुरुषांची ऐतिहासिक पुस्तके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. महेश गुडे यांनी कालची स्त्री व आजची स्त्री, योग्य व चुकीची आहार पद्धती, परिवर्तन हा काळाचा नियम याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. रेश्मा देशमुख सरताळे यांनी वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्वे आहाराचे नियोजन, आयुर्वेद पद्धती व त्याचे फायदे, मोफत सरकारी सुविधा व स्कीम याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच दिगंबर मिसाळ यांनी ग्रामीण महिला व शहरी महिला यातील तफावत, रक्तदानाचे महत्त्व, स्त्री ही कुटुंबाचे केंद्रस्थान व प्रत्येक गोष्टीची सुरुवात घरच्या स्त्री पासून याबद्दल मार्गदर्शन केले. प्राध्यापक मीनाक्षी अमोल जगदाळे यांनी भारतीय कुटुंब व्यवस्था व स्त्री, स्त्रीभ्रूणहत्या, महिलांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या बरोबरीचे स्थान, कुटुंबामध्ये बरोबरीचे स्थान तसेच वेगवेगळ्या मोफत सरकारी योजना याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी महिलांसाठी सर्व रोग निदान चाचण्यांचे नियोजन करण्यात आले होते. महिलांमधील रक्तदाब, रक्तगट, हिमोग्लोबिन, ईसीजी, रक्त शर्करा, थायरॉईड यांचीही तपासणी करण्यात आली. यावेळी शेकडो महिलांची या शिबिरामध्ये तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी सौ. वनिता कोरटकर, सौ. स्वाती जगताप, सौ. गवसने, सौ. उज्वला अडाणे, सौ. सायली लोखंडे, सौ. एकतपुरे, सौ. देशमुख, सौ. केंजळे, सौ. पाटील, सौ. जगदाळे, सौ. गोडसे, सौ. भाकरे तसेच सौ. सुनिता भालेराव आदी परिचारिका, सौ. माधुरी पाखरे औषध निर्माता, सौ. वैशाली पांडव लॅब टेक्निशियन, सिस्टर सौ. केंजळे, सौ. पठाण, सौ. राठोड, सौ. शिंगाडे, सौ. मोरे, सौ. जाधव, सौ. कीर्तके, तसेच जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी सदस्य व असंख्य महिला उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. वनिता कोरटकर यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng