महिला भगिनींनी पुरुषांबरोबर शेतीमध्ये काम करण्यासाठी पदर खोचलेला आहे…
पती-पत्नी दहावीच्या पुढे गेलेले नाहीत मात्र, मुली बीएससी ॲग्री करून आधुनिक शेती सुरू आहे..
महाळुंग (बारामती झटका)
महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत हद्दीतील श्री. रामदास चांगदेव जमदाडे व सविता रामदास जमदाडे या उभय पती-पत्नींना दहावीच्या पुढे शिक्षणात जाता आले नाही मात्र, त्यांनी आपल्या दोन मुली बीएससी ॲग्री करून आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागात महिला भगिनींनी पुरुषांबरोबर शेतीमध्ये काम करण्यासाठी पदर खोचलेला असतो. अशाच भगिनी सौ. सविता रामदास जमदाडे आपल्या शेतामध्ये एका महिलेला कामावर घेऊन केळीची लागवड केलेल्या रोपांना बादलीमधून औषध टाकत आहे.
रामदास चांगदेव जमदाडे रा. जमदाडे वस्ती, महाळुंग यांचा चांदज येथील विठ्ठल गाडे पाटील यांची कन्या सविता यांच्याशी २७ वर्षांपूर्वी विवाह झालेला आहे. त्यांना हर्षदा व सिद्धी दोन मुली आणि शिवराज एक मुलगा आहे. पती-पत्नीने मनाशी खूणगाठ बांधली. आपण कमी शिकलेलो आहे, आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा संकल्प त्यांनी केला. हर्षदा ने बीएससी हॉर्टिकल्चर पूर्ण केलेले आहे तर सिद्धी ने बीएससी ॲनिमेशन पूर्ण केलेले आहे. तर, मुलगा शिवराज दहावीमध्ये शिकत आहे.
शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान जमदाडे परिवार यांनी अवगत केलेले आहे. पती-पत्नी व मुलगा शिवराज शेतीमध्ये काबाड कष्ट करीत असतात. दहा एकरच्या आसपास शेती आहे. शेतामध्ये ऊस, केळी ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. काही कामानिमित्त रामदास जमदाडे बाहेरगावी व शिवराज शाळेमध्ये गेल्यानंतर सविता जमदाडे शेतीमध्ये काम करीत असतात. त्यांनी ऊन, वारा, पाऊस याचा कधीही विचार केलेला नाही. वेळप्रसंगी रोजंदारीवर महिलेला कामावर घेऊन शेतातील कामे सुरू ठेवत असतात.
महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत कार्यालयातील शासकीय काम आटपून बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील अकलूजकडे जात असताना जमदाडे वस्ती येथे केळीच्या लागवड केलेल्या रोपांना बादली मध्ये तयार केलेले औषध डब्याने बुडाच्या बाजूला ओतत होते. उन्हाचा चटका सुरू असताना दोघींचे काम सुरू होते. समाजामध्ये महिलांनी शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने काम करावे यासाठी सौ. सविता रामदास जमदाडे यांच्याशी सुसंवाद साधला त्यावेळेस त्यांनी माहिती दिलेली आहे. सर्व काही ऐकून समाजातील महिलांनी प्रेरणा घ्यावी अशा पद्धतीने जमदाडे परिवाराची शेती आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng