महिलेवर जबरदस्तीने धमकावून बळजबरीने अत्याचार (बलात्कार) व मारहाणीचा आरोप असणाऱ्या बब्रुवान प्रमोद मलमे यास माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मंजूर
मे. कोर्टाने आरोपींच्या जामीन अर्जावरती बचावासाठीचा युक्तिवाद मान्य करून अटी व शर्तीच्या अधीन राहून जामीन अर्ज मंजूर – आरोपीचे वकील ॲड. प्रशांत रुपनवर.
माळशिरस ( बारामती झटका )
जबरदस्तीने धमकावून बळजबरी अत्याचार व मारहाण केल्याचा आरोप असणारे आरोपी बब्रुवान प्रमोद मलमे लवंग सेक्शन, याचेवर अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला होता.
सदर आरोपीच्या बाजूने बचावासाठी युक्तिवाद ॲड. प्रशांत रुपनवर यांनी न्यायालयात केलेला होता.
सदर आरोपीचा बचावासाठीचा युक्तिवाद मेहरबान कोर्टाने मान्य करून अटी व शर्तीच्या अधीन राहून आरोपीस जामीन मंजूर केला आहे.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की, अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 0369 दि. 22/05/2022 रोजी बब्रुवान प्रमोद मलपे लवंग सेक्शन, ता. माळशिरस, यांच्यावर भारतीय दंड संहिता 1960 कलम 376, 366, 327 323 504 506 प्रमाणे गुन्हा नोंद झालेला होता.
सदर गुन्ह्यांमध्ये आरोपीने ओळखीचा फायदा घेऊन बळजबरीने अत्याचार करून दुसऱ्या तालुक्यामध्ये घेऊन जाऊन आरोपीच्या ओळखीच्या ठिकाणी पंधरा दिवस ठेवून जबरदस्तीने व बळजबरीने शरीर संबंध करत असत. प्रतिकार केल्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करीत असे. माझ्या गळ्यातील सोन्याचे मणी, मंगळसूत्र, दागिने जबरदस्तीने काढून घेतलेले आहेत. अशा आरोपाची फिर्याद अकलूज पोलीस स्टेशन येथे दिलेली होती.
अकलूज पोलीस स्टेशन तपास अधिकारी यांनी सदर आरोपीस अटक केलेली होती. न्यायालयात जामिनासाठी आरोपीच्या बाजूने युक्तिवाद ॲड. प्रशांत रुपनवर यांनी मांडलेला होता.
जिल्हा व सत्र न्यायालय माळशिरस नियमित जामीन अर्ज क्रमांक 226 20 22 दि. 15/07/2022 रोजी निकाल दिला.
आरोपीस माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मंजूर
मे. कोर्टाने आरोपींच्या जामीन अर्जावरती बचावासाठीचा युक्तिवाद मान्य करून अटी व शर्तीच्या अधीन राहून जामीन अर्ज मंजूर केला. – आरोपीचे वकील ॲड. प्रशांत रूपनवर.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great article! I found the insights really valuable and well-presented. Curious to hear other perspectives on this. Check out my profile for more interesting reads!