मांडवे गावच्या ग्रामसभेमध्ये सरपंच यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन जनतेचे हित व कल्याण पाहिलेले आहे..
मांडवे (बारामती झटका )
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये सर्वात मोठी क्षेत्रफळाच्या दृष्टीने व राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असणारी मांडवे ग्रामपंचायत आहे. या मांडवे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचे आयोजन मंगळवार दि. २९/०८/२०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर हनुमान मंदिर येथे सकाळी ११ वा. करण्यात आले होते. ग्रामसभेचे अध्यक्ष विद्यमान ग्रामपंचायत सरपंच हनुमंतराव टेळे होते.
यावेळी ग्रामसभेसमोर अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ग्रामसभेचे अध्यक्ष तथा सरपंच हनुमंतराव टेळे यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन जनतेचे हित व कल्याण पाहिलेले आहे. ग्रामसभेमध्ये सर्व उपस्थित ग्रामस्थांच्या व सदस्यांच्या समोर आरो फिल्टरचे पाणी सर्वांना मोफत देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरपंच व ग्रामसभेचे अध्यक्ष हनुमंतराव टेळे यांनी जाहीर केला. यावेळी सर्व उपस्थित जनतेने टाळ्यांच्या गजरामध्ये निर्णयाचे स्वागत केले होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great mix of humor and insight! For more, visit: READ MORE. What do others think?