Uncategorizedताज्या बातम्या

मांडवे सदाशिवनगर येथील मुक्ताई क्लाॅथ सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त खरेदीवर 20% डिस्काउंट, ग्राहकांचा उदंड प्रतिसाद.

वस्ताद बाजीराव देशमुख व माजी नगराध्यक्षा द्रोपदी देशमुख यांचे चिरंजीव व माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांचे बंधू नगरसेवक विजय देशमुख यांनी ११० साडी खरेदी केलेली असल्याने पालवे पाटील यांच्याकडून सन्मान…

सदाशिवनगर ( बारामती झटका )

आळंदी-पुणे-पंढरपूर रोडवर मांडवे सदाशिवनगर गावच्या सरहद्दीवर असलेल्या मुक्ताई क्लाॅथ सेंटरचा वर्धापन दिन दसऱ्याच्या मुहूर्तावर येत आहे. त्यानिमित्त खरेदीवर 20% डिस्काउंट सुरू केलेला आहे. याला ग्राहकांचा खरेदीसाठी उदंड प्रतिसाद मिळत आहे. वस्ताद स्व. बाजीराव देशमुख व माळशिरस नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा द्रौपदी देशमुख यांचे चिरंजीव व माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांचे चुलत बंधू विद्यमान नगरसेवक विजय देशमुख यांनी घरगुती कार्यक्रमासाठी छापील साड्या १०० व इरकल साड्या १० अशा पद्धतीने एकाच वेळी ११० साड्यांची रोख खरेदी केलेली असल्याने वर्धापन दिन व दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर विजय देशमुख यांचा सन्मान प्रगतशील बागायतदार बबनराव सोपान पालवे पाटील आणि श्री. सुभाष बबनराव पालवे पाटील यांनी कपड्याच्या दुकानांमध्ये सन्मान केलेला आहे.

मांडवे गावामध्ये शेती व्यवसाय करून पालवे पाटील कुटुंबाने आपली आर्थिक परिस्थिती केलेली आहे. प्रतिकूल परिस्थितीत पालवे पाटील यांनी आपल्या शेतामध्ये अफाट कष्ट, जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर शेतामध्ये डाळिंब, द्राक्ष, सिताफळ अशी अनेक पिके घेऊन अहोरात्र कष्ट करून प्रपंचा सुधरवला आहे.

श्री. बबनराव सोपानराव पालवे पाटील यांना प्रतिकूल परिस्थितीत तामशीदवाडी येथील वाघमोडे परिवारातील सौ‌. सुमन यांची मोलाची साथ मिळालेली आहे. श्री. सुभाष बबनराव पालवे पाटील यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून मुक्ताई क्लाॅथ सेंटर सुरू केलेले आहे. दर्जेदार कपडे, माफक नफा व ग्राहकांशी सुसंवाद या त्रिसूत्रीमध्ये सुभाषराव यांनी उद्योग व्यवसायात गगन भरारी घेतलेली आहे. त्यांना तामशिदवाडी येथील वाघमोडे परिवारातील सौ. गीता यांचे सहकार्य लाभत असून भाचा राहुल कोळेकर याचीही चांगली मदत होत आहे.

दुकानातील महिला व पुरुष कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. कपड्याचे भव्य शोरूम उभारलेले आहे. त्यामध्ये शर्टीग, शुटिंग, साड्या, शालू, रेडीमेड, होजीअरी सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध व किफायतशीर किंमतीत मिळत असल्याने ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

वर्धापन दिन व दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांसाठी खरेदीवर वीस टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. तरी ग्राहकांनी 9730768312 व 8999342448 या नंबरशी संपर्क साधावा, असे मुक्ताई क्लाॅथ सेंटरचे पालवे पाटील यांच्याकडून नम्र विनंती आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Back to top button