माळीनगरच्या दोन एनसीसी कॅडेट्सची उटी ट्रेकिंग कॅम्पसाठी निवड
माळीनगर ( बारामती झटका )
माळीनगर येथील दि मॉडेल विविधांगी प्रशालेच्या दोन एनसीसी कॅडेट्सची तामिळनाडू येथे होणाऱ्या ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्पसाठी निवड झाली आहे. तामिळनाडू एनसीसी डायरेक्टरेट आणि एनसीसी ग्रुप हेडकॉटर कोईम्बतूर यांचे वतीने तामिळनाडू राज्यातील उटी येथे दि. २६ एप्रिल ते दि. ५ मे २०२३ या कालावधीत ऑल इंडिया ट्रेकिंग एक्सपेडीशन या एनसीसी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्तरावरील ट्रेकिंग कॅम्पसाठी संपूर्ण देशातून कॉलेज व हायस्कूलचे एनसीसी गर्ल्स कॅडेट व ऑफिसर मिळून एकूण ५०० संख्या सहभागी होणार आहेत. या कॅम्पकरिता माळीनगर येथील मॉडेल विविधांगी प्रशालेचे एनसीसी कॅडेट सार्जंट प्रियंका प्रदीप कोळसे व कार्पोरल अनिष्का संजय नवले या दोघींची निवड झाली आहे. या कॅडेट्सना ३८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजेश गजराज, ऍडम ऑफीसर कर्नल विक्रम जाधव, सुभेदार मेजर अरूण ठाकुर तसेच प्रशालेच्या एनसीसी ऑफिसर सुखदा विधाते व एनसीसी ऑफिसर रणजीत लोहार यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे, व्हा. चेअरमन नितीन इनामके, सेक्रेटरी प्रकाश गिरमे, खजिनदार पृथ्वीराज भोंगळे, संचालक अशोक गिरमे, अनिल रासकर, ॲड. सचिन बधे, रत्नदीप बोरावके, डॉ. अविनाश जाधव, अजय गिरमे, कल्पेश पांढरे, दिलीप इनामके, संचालिका लिनाताई गिरमे, ज्योतीताई लांडगे, प्राचार्य प्रकाश चवरे, उपप्राचार्य कलाप्पा बिराजदार, पर्यवेक्षक रितेश पांढरे व शिक्षक वर्ग यांनी कॅडेट्सचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng