माजी आमदार स्व. चांगोजीराव देशमुख यांना जयंतीनिमित्त डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचेकडून विनम्र अभिवादन करण्यात आले.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्नेहाचा व आपुलकी वारसा डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी जपला
अकलूज ( बारामती झटका)
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे विश्वासू सहकारी माळशिरस विधानसभेचे माजी आमदार स्वर्गीय चांगोजीराव उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युवा नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी आबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती श्री. पांडुरंगभाऊ देशमुख, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. सतिशनाना पालकर, श्री. रणजित देशमुख, श्री. आण्णासाहेब इनामदार, श्री. फिरोज देशमुख, श्री. जुल्कर शेख, अकलूज काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष श्री. नवनाथ साठे, श्री. गोपाळ गुळवे, श्री. दिपक सुत्रावे आदी उपस्थित होते.
माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी तालुक्यातील तमाम जनतेला विजयदादांच्या लग्नाचे औचित्य साधून लक्ष भोजन दिलेले होते. यामुळे तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सहकार महर्षी यांना विधान परिषदेचे तिकीट दिलेले नव्हते. मात्र, सहकार महर्षी यांनी विश्वासू सहकारी चांगोजीराव देशमुख यांना विधान सभेची उमेदवारी दिलेली होती. चांगोजीराव देशमुख यांनी सहकार महर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार कालावधीत सर्वसामान्य जनतेचे हित जोपासलेले होते.
सहकार महर्षी यांचे विश्वासू सहकारी म्हणून चांगोजीराव देशमुख सुपरीचीत होते.सहकार महर्षी यांच्या पश्चात माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील चांगोजीराव देशमुख यांचा नेहमी राजकारणामध्ये बुजुर्ग व्यक्तिमत्व व वडिलांचे विश्वासू सहकारी म्हणून सल्ला घेत असत.
सहकार महर्षी नंतर देशमुख परिवार यांच्याशी लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे सलोख्याचे संबंध होते. लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पश्चात युवा नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा देशमुख परिवार यांच्याशी स्नेहाचा व आपुलकीचा वारसा जपताना पहावयास मिळत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great read! Your perspective on this topic is refreshing. For additional information, I recommend visiting: DISCOVER MORE. What do others think?