ताज्या बातम्याराजकारण

माजी उपमुख्यमंत्री विजयदादा यांच्या विकास वाटेवरून विद्यमान उपमुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या विकास वाटेचा हात धरून आमदार राम सातपुते यांची दमदार वाटचाल सुरू आहे.

अकलूजचे नाव घेताच विजयसिंह मोहिते पाटील यांचे नाव तर माळशिरसचे नाव घेताच रामभाऊ सातपुते यांचे नाव निघणार आहे.

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील उर्फ विजयदादा यांच्या विकास वाटेवरून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस उर्फ देवाभाऊ यांच्या विकास वाटेचा हात धरून भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची विकास वाटेवरून दमदार वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये राजकारण करीत असताना अकलूज नावाची विजयदादांनी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. अनेक शासकीय कार्यालय अकलूज येथे आहेत. त्याच धर्तीवर शासकीय विश्रामगृहसुद्धा शहरासारखे तयार केलेले आहे. माळशिरस शहर तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी शासकीय विश्रामगृह नूतनीकरण व विस्तारीकरण व्हावे, अशी जनतेची मागणी होती. त्याप्रमाणे माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह नूतनीकरण व विस्तारीकरणासाठी लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी 03 कोटी 76 लाखाचा भरघोस निधी मंजूर केलेला आहे. महायुती सरकारने भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा अभिनंदन डिजिटल लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी सोशल मीडियावर टाकलेले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर लोकप्रतिनिधी आल्यानंतर शासकीय विश्रामगृह अकलूजचे नाव घेताच विजयसिंह मोहिते पाटील यांचे नाव तर माळशिरसचे नाव घेताच रामभाऊ सातपुते यांचे नाव निघणार आहे.

महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांची नातेपुते येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिली जाहीर सभा झालेली होती. त्यावेळेला भाषणामध्ये देवेंद्रजी फडवणीस यांनी माळशिरस तालुक्यामधील विकास करण्याकरता कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिलेले होते. राम सातपुते यांना आमदार करा तुमच्या समस्या, अडचणी दूर करण्याची जबाबदारी माझी असल्याचे देवेंद्र फडवणीस यांनी सांगितलेले होते. दुर्दैवाने गेल्या अडीच वर्षांमध्ये भाजप व शिवसेनेची युती 25 वर्षापासून होती. त्या युतीचे विभाजन होऊन महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशा पक्षाचे सरकार स्थापन झालेले होते. त्यामुळे माळशिरस तालुक्यात म्हणावा असा निधी विकासकामांना मिळालेला नव्हता. अडीच वर्षानंतर शिवसेनेमधून बंड करून एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह भाजप समवेत सरकार स्थापन केले. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस झालेले होते. त्यामुळे माळशिरस तालुक्यामध्ये प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्याकरता लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी कोणत्याही विभागाकडे विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयाची मागणी केल्यानंतर मंजूर होत होती. सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार सामील होऊन उपमुख्यमंत्री पद व राज्याचे अर्थमंत्री खात्याचा पदभार सांभाळत आहेत. विकासप्रिय असणारे देवेंद्रजी फडणवीस आणि त्याच तोला मोलाचे विकासकामाने झपाटलेले अजितदादा पवार यांच्यामुळे माळशिरस तालुक्याला भरघोस निधी उपलब्ध होत आहे.

माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात विकासकामे झाली, असे पश्चिम भागातील लोकांमध्ये चर्चा असत. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी पूर्व भागासह माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागाला भरघोस निधी दिलेला असल्याने माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील विकासाचा बॅकलॉग भरून निघाला असल्याची चर्चा जनतेमधून होत आहे. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील एक गाव किंवा वाडी वस्ती सोडलेली नाही. संपूर्ण ठिकाणी निधी देण्याचे काम केलेले आहे. देवी देवतांच्या समोर सभामंडप, अनेक जाती धर्मातील लोकांना समाज मंदिर, स्मशानभूमी, दफन भूमी, अनेक ठिकाणी पानंद रस्ते, कॉंक्रीट रस्ते, डांबरी रस्ते, नवबौद्ध वस्ती मधील रस्ते, गटार, शालेय खोल्या, कंपाऊंड, क्रीडांगण अशी अनेक कामे करून माळशिरस तालुक्यातील अनेक रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा देऊन दर्जेदार रस्ते बनवण्याचे काम सुरू आहे. माळशिरस तालुक्यात विकासकामांबरोबर नव्याने जनता दरबार सुरू करून ग्रामीण भागातील लोकांना शासकीय विश्रामगृह अजून कितीतरी लोकांनी पाहिलेले नव्हते, ते शासकीय विश्रामगृह जनता दरबार म्हणून मतदार संघात सुप्रसिद्ध आहे. जनता दरबारामधून अनेक लोकांची कामे करण्याचा सपाटा सुरू आहे.

आरोग्यदूत म्हणून आमदार राम सातपुते यांची वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला न परवडणारी सर्व अवयवाची ऑपरेशन मोफत करून जनतेला दिलासा देण्याचे काम आरोग्यदूत आमदार राम सातपुते यांचे सुरू आहे. माळशिरस तालुक्याचे आमदार सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात. जनतेला सहज उपलब्ध होणारे आमदार म्हणून त्यांच्याकडे गोरगरीब व सर्वसामान्य जनता आपला माणूस म्हणून पहात आहे. अशा लोकप्रिय दमदार आरोग्यदूत आमदार राम सातपुते यांची समाधानकारक कामगिरी असल्याने माळशिरस तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कार्याचा बोलबाला सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

4 Comments

  1. It should be noted, however, that this study does not provide definitive proof for the role of autophagy due to multiple alternative explanations to these observations priligy 60 mg price Evidence for TCA inhibition of ATPase activity has been documented in human erythrocyte plasma membranes and skeletal sarcoplasmic reticulum membranes

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button