माजी उपमुख्यमंत्री विजयदादांच्या भेटीला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर शिवरत्न बंगल्यावर गेले होते.
अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व माढा लोकसभेचे माजी खासदार भाजपचे विशेष निमंत्रित सदस्य विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीला माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर शिवरत्न बंगल्यावर गेलेले होते.
अकलूज येथे ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम संपल्यानंतर विजयदादांच्या भेटीसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आवर्जून शिवरत्न बंगल्यावर गेलेले होते. मात्र, विजयदादांची आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट झालेली नाही. दादा झोपलेले आहेत, असा निरोप देण्यात आला. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयदादांच्या भेटीला गेले, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा झाला व भारतीय जनता पक्षाचा प्रोटोकॉल सुद्धा झाला. मात्र, दादांची भेट न होता परत आले याची राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे. विजयदादा खरंच झोपले होते ?, का कोणीतरी खोटेच सांगितले ?, असेही तर्कवितर्क काढले जात आहेत.
विजयदादांची भेट झाली नाही मात्र, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आई-वडिलांनी घालून दिलेला थोरा मोठ्यांचा आदर करणे हाच संस्कार नाईक निंबाळकर यांनी जपलेला असल्याने संस्कारांची चर्चा सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng