माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे स्टार प्रचारक असणार..
माढा लोकसभेचे पाणीदार व कार्यतत्पर खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर कसे निवडून येतात म्हणणाऱ्यावर निवडून आणण्याची जबाबदारी येणार…..
फलटण ( बारामती झटका )
महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका पाहता महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील राजकारणाचा रंग बदलणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार व कार्य तत्पर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर लोकसभेला कसे निवडून येतात असे म्हणणारे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निवडून आणण्याची जबाबदारी येण्याची शक्यता असल्याने माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर माढा लोकसभा मतदारसंघाचे फिक्स संभाव्य उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे स्टार प्रचारक असणार का ? असा राजकीय वर्तुळामध्ये सवाल उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची वेगळी भूमिका घेऊन विरोधी पक्ष पदाचा राजीनामा देऊन भाजपच्या विचाराचे असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजितदादा पवार यांनी घेतलेली असून त्यांच्यासोबत अनेक राष्ट्रवादीतील दिग्गज नेते व मंत्री यांनी शपथ घेऊन काही शपथविधीला उपस्थित होते त्यामुळे भविष्यात भाजप लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त भाजपच्या विचाराचे खासदार निवडून आणण्याच्या तयारीत आहेत माढा लोकसभा मतदार संघातील पाणीदार व कार्य तत्पर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा मतदारसंघात अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडून अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत महाराष्ट्रामध्ये यशस्वी खासदार यामध्ये रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचे नाव चर्चिले जात आहे माढा लोकसभेसाठी रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर वरिष्ठ पातळीवरून शिक्कामोर्तब झालेला आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी घडलेल्या असल्याने राष्ट्रवादीचे दिग्गज नेते भाजपच्या निवडणुकीत प्रचारात दिसतील असे राजकीय विश्लेषकांचे मत असल्याने माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर माढा लोकसभा मतदारसंघात वरिष्ठ नेते असल्याने त्यांच्यावर माढा लोकसभा मतदारसंघाची स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी असणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng