Uncategorizedताज्या बातम्या

माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी !! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त कृषी विभागाचा स्तुत्य उपक्रम.

नातेपुते ( बारामती झटका )

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चे औचीत्य साधून तालुका कृषि अधिकारी कार्यक्षेतातील गावामध्ये माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी हा उपक्रम १ सब्टेबर ते ३० नोव्हेबर २०२ २ या कालावधीत राबविला जाणार आहे. या उपक्रमाअतर्गत दूर्गम डोंगराळ गावाची मंडळ कृषि अधिकारी नातेपुते मधून कोथळे ‘लोणद पिरळे-बागर्डे व मंडळ कृषि अधिकारी पिलिव मधून शिगोर्णी या गावाची निवड करण्यात आले होती . या उपक्रमाअतर्गत मौजे शिगोर्णी येथील श्री सुरज खांडेकर यांचे शेतावर जाऊन ते व समुदाय यांना कृषि पुरक उदयोग मका बाजरी प्रक्रिया पीएम किसान केवायसी किड नियंत्रण बाबत श्री सतीश जगताप मं. कृ अ पिलिव श्री अनिल फडतरे कृप व श्री देवकाते कृस यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून मौजे पिरळे -बागडे पंचक्रोशीतील शेतकरी बांधवासाठी कृषि महाडीबीटी योजना अनेक अर्ज एक कॅम्प कृषि विभाग व ग्रामपंचायत पिरळे यांचे संयुक्त विद्यमाने श्री अमित गोरे कृ.से यांनी आयोजीत केला होता या मध्ये १५ नवीन लामार्थी व १२ जून्या अर्जाची दुरुस्ती करून घेण्यात आली व याबरोबर फळबाग लागवड अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत महिती श्री गोरख पांढरे कृप यांनी दिली व श्री वगरे ग्रामसेवक व शेतीमित्र यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमा अंतर्गत मौजे कोथळे गावाला प्र तालुका कृषि अधिकारी माळशिरस श्री सतीश कचरे यांनी भेट देऊन रघूनाथ माने यांना एकात्मिक शेती पद्धती ठिबक सिंचन व अन्न प्रक्रिया उद्योगाची माहिती देण्यात आली . सामाजिक सुरक्षा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ची माहिती फॉर्म १ सप्टेबर रोजी सर्पदशामुळे मृत आण्णा कवितके यांचे कुटूबाचे सात्वन करून त्याची पत्नी अलका कवितके यांना देण्यात आली.

मौजे लोणद या डोंगराळ गावात डाळीबाची शेतीशाळा श्री मल्हारी होळ यांचे शेतात घेण्यात आली यासाठी १८ लाभार्थी उपस्थित होते . उपस्थितांना श्री उदय साळूखे कृप . श्री रणजीत नाळे कृस श्री कुलदिप ढेकळे व श्री सतीश कचरे मं. कृ अ यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.

अशा प्रकारे वरील कालावधीत महिन्यातील माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी तालुका कृषी अधिकारी माळशिरस कार्यालय सर्व अधिकारी व कर्मचारी राबविणार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button