माढा लोकसभा मतदार संघाला भूमिपुत्र पेक्षा पाणीदार पुत्र खासदार असावा अशी, मतदार व शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे…
नीरा-देवधर, कृष्णा-भीमा स्थिरीकरण, योजनेसह माढा लोकसभा मतदार संघातील सिंचनाचे कागदावरील प्रकल्प अस्तित्वात येण्यास सुरुवात….
माळशिरस (बारामती झटका)
लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागलेली आहे, तसतशी अनेक मतदार संघात कोण खासदार ? याविषयी राजकीय वर्तुळात रंगत वाढत आहे. त्यामध्ये देशाच्या चर्चेत असणारा माढा लोकसभा मतदारसंघ मागे कसा असणार, या लोकसभा मतदार संघात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला या चार विधानसभा व सातारा जिल्ह्यातील फलटण व माण खटाव या दोन विधानसभा मतदार संघाबरोबर इतर मतदार संघातील गावे माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. येणाऱ्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील चार मतदार संघातील नेत्यांनी कार्यकर्ते सोशल मीडियावर कार्यरत केलेले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाला भूमिपुत्र खासदार असावा मात्र, सर्वसामान्य जनता व मतदार भूमिपुत्र पेक्षा पाणीदार पुत्र खासदार असावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना दिसत आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये माढा लोकसभा मतदारसंघात कागदावरील निरा-देवधर, कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसह मतदार संघातील अनेक सिंचनाचे प्रकल्प कागदावर होते. हे प्रकल्प सत्यात व अस्तित्वात येण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारकडून माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावलेले असल्याने विशेष करून सोलापूर जिल्ह्यातील मतदार व शेतकरी बांधव पाणीदार खासदार यांच्या दमदार कामगिरीवर समाधानी आहेत..
कृष्णा भिमा स्थिरीकरण सारख्या प्रकल्पास केंद्र सरकार मंजुरी देत नव्हते, कृष्णा फ्लड डायव्हर्षन मधून पुराचे वाहून जाणार्या पाण्याचा सखोल अभ्यास करून, त्यास केंद्राची संमती मिळवली आहे. यातून मिळणारे पाणी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
यासाठीची जवळपास कामे प्रगती पथावर अंतिम टप्प्यात आली आहेत. केवळ सापटेवाडीमधून फलटन तालुक्यातील आसू जवळ बोगदा उघडून त्यातून उद्धट तावशीच्या नवीन बोगद्यातून ते पाणी उजनीत येणार आहे. या उद्घट तावशीच्या बोगद्याचे काम जवळ जवळ पूर्ण होत आले असून सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. शिवाय उजनीच्या पुढे कोळेगाव बोगद्याचे काम ही लवकरच पूर्ण होईल.
केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्रसिंह शेखावत हे या प्रकल्पास येणाऱ्या १५ ते १७ हजार कोटी रुपयांच्या खर्च पैकी ८० टक्के खर्च उचलण्यास केंद्र सरकार तयार असल्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांना पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समक्ष फोन करून सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाटेला येणाऱ्या २० टक्के खर्चापैकी अगोदरच मराठवाड्याला पाणी नेण्याच्या योजनांसाठी जवळपास १५ टक्के खर्च झाला आहे. त्यामुळे जरी राज्याला २/३ हजार कोटी भरावे लागले तरी एशियन डेव्हलपमेंट बँक त्यासाठी मदत करण्यास तयार आहे. तशी या योजनेच्या लाभ धारक भागातील आमदार बबनदादा शिंदे, आ. जयकुमार गोरे, आ. शहाजीबापू पाटील, आ. संजयमामा शिंदे यांची बँकेच्या अधिकारी यांच्याशी चर्चा झालेली आहे.
माण तालुक्याच्या पोटातून येणारे हे पाणी संपूर्ण माढा मतदार संघातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या योजनेतून मिळणाऱ्या ५१ टीएमसी पाण्यातून ५ टीएमसी पाणी उचलून त्यातून २ टीएमसी पाणी नीरा-देवघर धरणात, २ टीएमसी पाणी नीरा-उजवा कालव्यात, अर्धा टीएमसी पाणी धोमबलकवडी व अर्धा टीएमसी पाणी धरणात सोडण्याचे नियोजन केले आहे. उजनी उपसा सिंचन योजनेतून माढा, करमाळा तालुका तर नवीन सांगोला उपसा सिंचन योजनेतून सांगोला तालुक्यात पाणी मिळणार आहे. त्यासाठी वेगळ्या २ टीएमसी पाण्याचे नियोजन केले आहे.
सोलापूरसाठी ४ टीएमसी पाणी लागते मात्र, त्यासाठी समांतर जलवाहिनीसाठी १२ टीएमसी पाणी सोडावे लागते. शिवाय उजनी धरणातून गाळ काढण्यासाठीचे पत्र आ. बबनदादा शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे भविष्यात माढा लोकसभा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न मिटणार असून मराठवाड्याचाही प्रश्न सुटणार आहे, अशी अनेक सिंचनाच्या प्रकल्पाची पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कामे करण्याचे सुरू असल्याने भारतीय जनता पक्ष व वरिष्ठ नेतृत्व खासदार यांच्या कार्यावर समाधानी आहेत. त्यामुळे भविष्यात निश्चितपणे पक्ष व जनता माढा लोकसभा मतदार संघाला भूमिपुत्र पेक्षा पाणीदार पुत्र खासदार मतदार व शेतकरी बांधवांना अपेक्षित आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great read! The depth and clarity of your analysis are impressive. If anyone is interested in diving deeper into this subject, check out this link: DISCOVER MORE. Looking forward to everyone’s thoughts!