माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार निधी व इतर योजनेतून माळशिरस तालुक्यातील विकासकामांना निधी दिला आहे.
माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी ५४ कोटी ३९ लाख ६० हजार रुपयांचा निधी मंजूर
फलटण-पंढरपूर रेल्वे, नीरा-देवधर कॅनॉल या प्रलंबित कामांना गती देऊन विकासकामांवर भर दिलेला आहे.
माळशिरस (बारामती झटका)
माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी माळशिरस तालुक्यासाठी खासदार निधी व इतर योजनेतून विकास कामे करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. यामध्ये माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गट व नातेपुते, माळशिरस, महाळुंग, श्रीपूर नगर पंचायतसाठी खासदार निधीतून व इतर योजनेतून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. माळशिरस तालुक्याच्या विकासाला व दळणवळणाला गती देणारा इंग्रज कालीन रखडलेला फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग व माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा निरा-देवधर प्रकल्पातील प्रलंबित २२ गावांच्या कॅनॉल चा प्रश्न, असे प्रश्न सोडवून तरुणांच्या हाताला काम व उद्योग व्यवसायाला चालना देण्याकरिता धुळदेव-म्हसवड कॉरिडॉरमध्ये गारवाड गावचा समावेश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये कोरोना परिस्थिती असल्याने गावातील विकासकामांना निधी पुरेसा उपलब्ध नव्हता. गेल्या वर्षीपासून निधी उपलब्ध झाल्यानंतर माळशिरस तालुक्यातील गावांना विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितभाई शहा, केंद्रीय अध्यक्ष नड्डा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची मतदार संघामध्ये दमदार वाटचाल सुरू आहे.
दहिगाव जिल्हा परिषद गटातील गुरसाळे गणात एकशिव गावासाठी स्ट्रीट लाईट बसवणे ९० हजार व अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३ लाख रु., कुरबावी गावासाठी स्ट्रीट लाईट बसविणे ९० हजार रु., स्मशानभूमीमध्ये विसावा कट्टा बांधणे ३ लाख रु., गुरसाळे गावांमध्ये शिवाजीनगर घर ते स्मशानभूमी रोड पर्यंत ६ मीटर वरती ७२ वॅट फिटिंग, ट्रीट एलईडी दिवा बसविणे यासाठी १ लाख २५ हजार रु., जीनपुरी या गावासाठी स्ट्रीट लाईट बसवणे ९० हजार रु., डोंबाळवाडी (कुरबावी) या गावासाठी स्ट्रीट लाईट बसवणे ९० हजार रु., तांबेवाडी (कुरभावी) या गावासाठी स्ट्रीट लाईट बसविणे ९० हजार रु., शिंदेवाडी या गावासाठी शिंदेवाडी गुरसाळे नातेपुते रस्ता इजिमा १३८ सा.क्र. ६/०० ते ८/०० यासाठी २० लाख रु., श्री. दिलीप रणवरे घर ते स्मशानभूमी रोडपर्यंत ६ मीटर वरती ७२ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसविणे १ लाख २५ हजार रु., स्ट्रीट लाईट बसवणे यासाठी ९० हजार रु., शिंदेवाडी गावात डांबरीकरण रस्ते करणे ३ लाख रु., जिल्हा मार्ग शिंदेवाडी हनुमंत गाव रस्ता ग्रामा १०० सा.क्र. ०/५०० ते १/५०० यासाठी ३० लाख रु., हनुमान वाडी या गावासाठी गावअंतर्गत ६ मीटर वरती ७२ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवणे यासाठी १ लाख २५ हजार रु., हनुमान वाडी ते वाघवस्ती रस्ता करणे ३ लाख रु. असा ७१.१५ रूपये निधी दिला आहे.दहिगाव गणात कारूंडे गावासाठी स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., ग्रामपंचायत समोर शिवाजी महाराज चौक येथे पेवर ब्लॉक बसवण्यासाठी ३ लाख रु., दहिगाव येथे स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., बाजार कट्टा बांधणे व सुशोभीकरण करण्यासाठी ५ लाख रु., धर्मपुरी येथे शिंदेवाडी रोड ते मारुती मंदिर (काटकर वस्ती) येथे ६ मीटर वरती ७२ वॅट फिटिंग, स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., स्मशानभूमी दुरुस्ती करण्यासाठी ३ लाख रु., मोरोची येथे ग्रामपंचायत जागेत ६ मीटर वरती ४०/४८ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसविण्यासाठी १ लाख ५० हजार रु., अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी १० लाख रु., असा २५.२५ निधी मंजूर केला आहे. दहिगाव जिल्हा परिषद गटासाठी ९६.७० एवढा निधी मंजूर केला आहे.
नातेपुते जिल्हा परिषद गटातील नातेपुते गणात डोंगरवाडी (लोणंद) या गावासाठी स्ट्रीट लाईट बसवणे ९० हजार रु., लोणंद स्ट्रीट लाईट बसवणे ९० हजार रुपये.
नातेपुते नगरपंचायतीसाठी नातेपुते महादेव मंदिर पूर्व दरवाजा येथे हाय मास्ट दिवा बसवणे १ लाख ३० हजार रु., बरडकर मळा येथे जिम साहित्य देण्यासाठी २ लाख ५० हजार रु, मार्केट कमिटी बाजार गेट ते ज्ञानेश्वर माऊली चौक ६ मीटर वरती ७२ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख ७५ हजार रु., स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी १ लाख ५० हजार रु., बाजार कट्टा बांधणे व सुशोभीकरण करण्यासाठी ५ लाख रु., नातेपुते शहरातील मेन पेठ रस्ता सिल्कोट डांबरीकरण करणे व जुनी मंडळी ते बुरुजापर्यंत डांबरीकरण करण्यासाठी ५० लाख रु., नातेपुते येथे सभामंडप बांधण्यासाठी ९ लाख रु ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., असा नातेपुते गणात ७२.८५ रुपये निधी मंजूर केला आहे. फोंडशिरस गणात कळंबोली गावासाठी स्ट्रीट लाईट बसवणे ९० हजार रु., अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३ लाख रु., पळस मंडळ या गावासाठी ग्रामपंचायत जागेत ६ मीटर वरती ४०-४८ वॅट फिटींग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३ लाख रु., पिरळे या गावासाठी ग्रामपंचायत जागेत ६ मीटर वरती ४०-४८ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३ लाख रु., फोंडशिरस या गावासाठी ग्रामपंचायत जागेत ६ मीटर वरती ४०-४८ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., फोंडशिरस पिरळे रोड ते शेंडे मळा रस्ता ग्रामा ३७४ सा.क्रा. ०/०० ते २/०० रस्ता सुधारणे २२ लाख रुपये, बांगर्डे येथे स्ट्रीट लाईट बसवणे ९० हजार रु., अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३ लाख रु., मोटेवाडी (फो.) स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी 90 हजार रु. असा ४०.४५ रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. नातेपुते जिल्हा परिषद गटासाठी ११३.३० एवढा निधी मंजूर केला आहे.
निमगाव जिल्हा परिषद गटातील कण्हेर पंचायत समिती गणासाठी इस्लामपूर या गावात स्ट्रीट लाईट बसवणे ९० हजार रु., बाजार कट्टा बांधणे व सुशोभीकरण करणे ५ लाख रु., कन्हेर गावात स्ट्रीट लाईट बसवणे ९० हजार रु., गोरडवाडी गावासाठी ग्रामपंचायत जागेत ६ मीटर वरती ४०-४८ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवणे यासाठी १ लाख २५ हजार रु., ग्रामपंचायतीत सभामंडप बांधण्यासाठी १० लाख रु., जळभावी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे यासाठी २ लाख ७५ हजार रु., भांब या गावासाठी ग्रामपंचायत जागेत ६ मीटर वरती ४०-४८ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., मांडकी या गावासाठी स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., बाजार कट्टा बांधणे व सुशोभीकरण करण्यासाठी ५ लाख रु., भानवसेवस्ती कन्हेर या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., रेडे या गावात ग्रामपंचायत जागेत सभा मंडप बांधण्यासाठी ७ लाख रु., ग्रामपंचायती जागेत ६ मीटर वरती ४०-४८ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख ५० हजार रु., स्मशानभूमी दुरुस्त करण्यासाठी १० लाख रु., सरगरवाडी कन्हेर येथे स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., गिरवी रस्त्यालगत संदीप सरगर वस्ती ते शंकर परवे गिरवी शेत रस्ता खडीकरण करण्यासाठी १० लाख रु., कोथळे दडस वस्ती येथे बिरोबा मंदिर ते शंकर दडस यांचे शेत येथील मुख्य रस्ता खडीकरण करण्यासाठी १० लाख रु., फडतरी निटवेवाडी ते खुटबाव रस्ता ते राजगे वस्ती रस्ता सुधारणा करण्यासाठी १० लाख रु., मायाक्का मंदिर ते संभाजी बाबा मंदिर रोड डांबरीकरण करण्यासाठी १० लाख रु., सदाशिवनगर रोड मारुती निवृत्ती माने वस्ती ते होनमाने वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी १० लाख रु., असा कनेर पंचायत समिती गणासाठी ९९.१५ निधी मंजूर करण्यात आला आहे.
निमगाव पंचायत समिती गणातील कुसमोड गावासाठी ग्रामपंचायत जागेत ६ मीटर वरती ४०-४८ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., गारवाड या गावासाठी ग्रामपंचायत जागेत ६ मीटर वरती ४०-४८ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३ लाख रु., चांदापुरी गावामध्ये १० स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी २ लाख ५० हजार रू., चांदापूरी येथील ग्रामपंचायत जागेत ६ मीटर वरती ४०-४८ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., झिंजेवस्ती (पिलीव) येथे स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., निमगाव रोड ते वेळापूर शेरी रस्ता डांबरीकरण व खडीकरण करण्यासाठी दहा १० लाख रु., निमगाव येथे स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., बाजार कट्टा बांधणे व सुशोभीकरण करण्यासाठी ५ लाख रु., मगरवाडी गारवाड येथे स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., असा २६.९५ निधी मंजूर करण्यात आला आहे. निमगाव जिल्हा परिषद गटासाठी १२६.१० निधी मंजूर करण्यात आला आहे.
पिलीव जिल्हा परिषद गटातील तांदुळवाडी पंचायत समिती गणातील काळमवाडी या गावांमध्ये स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., तांदूळवाडी गावासाठी स्ट्रीट लाईट बसवणे ९० हजार रु., अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ५ लाख रु., फळवणी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., बाजार कट्टा बांधणे व सुशोभीकरण करण्यासाठी ५ लाख रु., मळोली या गावांमध्ये ग्रामपंचायत जागेत ६ मीटर वरती ४०-४८ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., बाजार कट्टा बांधणे व सुशोभीकरण करण्यासाठी ५ लाख रु., साळमुखवाडी ( मळोली) या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., असा तांदुळवाडी गणासाठी १९.८५ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. पिलीव पंचायत समिती गणातील कोळेगाव या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., पिलीव या गावात श्री संत सेना महाराज मंदिर येथे हायमास्ट दिवा बसविणे यासाठी १ लाख ३० हजार रु., बाजार कट्टा बांधणे व सुशोभीकरण करण्यासाठी ५ लाख रु., महाराणा चौक ते ग्रामसेवक क्वार्टर रस्ता १८ लाख रु., बचेरी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., शिंगोर्णी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., सुळेवाडी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३ लाख रु., असा ३०.९० निधी मंजूर करण्यात आला आहे. पिलीव जिल्हा परिषद गटासाठी ५०.७५ असा निधी मंजूर करण्यात आला आहे.
बोरगाव जिल्हा परिषद गटातील जांभूड पंचायत समिती गणात उंबरे वेळापूर या गावात गावठाण ते बाळा पाटील वस्ती पर्यंत ६ मीटर वरती ७२ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., कोंढारपट्टा या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., चंडकाईवाडी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., जांभूड या गावात ज्ञानेश्वर शेंडगे वस्ती ते शहाबुद्दीन शेख वस्ती पर्यंत ६ मीटर वरती ७२ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., जांभूड-माळेवाडी ते १५ सेक्शन प्र ११८ ग्रा ४९९ हा रस्ता बनवण्यासाठी ८ हजार रु., तोंडले या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., बाजार कट्टा बांधणे व सुशोभीकरण करण्यासाठी ५लाख रु., तोंडले ते भाळवणी ग्रा.मा. ५६२ साठी ८ हजार रु., दसुर या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., नेवरे या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., बोंडले या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., असा ३०.७० रुपये निधी जांभूड पंचायत समिती गणात मंजूर केला आहे. बोरगाव पंचायत समिती गणात उघडेवाडी या गावात ग्रामपंचायत जागेत ६ मीटर वरती ४०-४८ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., खंडाळी या गावात खंडाळी ते बी.एस.एस. श्रीपूर पंतप्रधान ग्राम सडक योजना २६०.८१ रू., स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., धानोरे या गावात ग्रामपंचायत जागेत ६ मीटर वरती ४०-४८ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३ लाख रु., बोरगाव या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., बाजार कट्टा बांधणे व सुशोभीकरण ५ लाख रु., भोसले वस्ती (खंडाळी) या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., माळखांबी उजनी या गावात माळखांबी उजनी कॅनॉल डीपी ते नामदेव जाधव वस्तीपर्यंत ६ मीटर वरती ७२ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १लाख २५ हजार रु., माळेवाडी (बोरगाव) हिम्मतराव पाटील घर ते तानाजी पांढरे वस्ती भवानीनगर पर्यंत ६ मीटर वरती ७२ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., माळखांबी या गावात. माळखांबी ते जांभूड पंतप्रधान ग्राम सडक योजना २५७.६४ रु., स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३ लाख रु., माळेवाडी जांबुड या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., माळेवाडी बोरगाव या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु. असा ५३९.८५ निधी मंजूर करण्यात आला आहे. बोरगाव जिल्हा परिषद गटासाठी ५७०.५५ एवढा निधी मंजूर केला आहे.
महाळुंग जिल्हा परिषद गटातील महाळुंग पंचायत समिती गणात मिरे या गावात गावठाण ते पांडुरंग गायकवाड गुंड वस्ती पर्यंत ६ मीटर वरती ७२ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रुपये महाळुंग नगर पंचायतमध्ये दत्तात्रय विठोबा लाटे वस्ती ते मेन रोड रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १०० मीटर १० लाख रु., महाळुंग फाटा नंबर २६ ते त्र्यंबक विठोबा लाटे वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे उत्तर दक्षिण ५०० मीटर १० लाख रु., बाळासाहेब वस्ती ते मेन रोड रामचंद्र जाधव रस्ता खडीकरण व डांबरीकरण १०० मीटरसाठी ५ लाख रु., सभा मंडप बांधण्यासाठी ९ हजार रु., स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ३ लाख रु., श्रीपुर या गावात श्रीपुर प्रजिमा ९३ रामा १२५ ते खंडाळी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून ५०५.७१ रु., असा ५४४.८६ निधी मंजूर केला आहे
लवंग पंचायत समिती गणात गणेशगाव या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., तांबवे या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., बाभुळगाव या गावात ग्रामपंचायत जागेत सभा मंडप बांधण्यासाठी ७ लाख रु., अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३ लाख रु., लवंग या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी १० लाख रु., वाघोली या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३ लाख रु., वाफेगाव या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., संगम या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., बाजार कट्टा बांधणे व सुशोभीकरण करण्यासाठी ५ लाख रु., असा 34. 90 निधी मंजूर करण्यात आला आहे. महाळुंग जिल्हा परिषद गटासाठी ५७९.७६ रुपये असा निधी मंजूर केला आहे.
मांडवे जिल्हा परिषद गटातील भांबुर्डी पंचायत समिती गणात खुळेवाडी तामशीदवाडी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., जाधववाडी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु, तामशीदवाडी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., पुरंदावडे या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., भांबुर्डी या गावात गिरवी भांबुर्डी रस्ता इजिमा ७४ सा. क्र. ०/८०० ते २/५०० यासाठी २० लाख रु., स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., येळीव या गावात येळीव ते मेडद पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून २७५.७७ रु., स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., सदाशिवनगर या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु, बाजार कट्टा बांधणे व सुशोभीकरण करण्यासाठी १० लाख रु., सदाशिवनगर - कन्हेर (लांडगीर मळा) ग्रामा ६० सा.क्र.३/०० ते ७/०० यासाठी १० लाख रु., असा ३२२.१८ रुपये निधी मंजूर केला आहे. मांडवे पंचायत समिती गणात कोथळे या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., गिरवी या गावात ग्रामपंचायत जागेत ६ मीटर वरती ४०-४८ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., निटवेवाडी (फडतरी) या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., पिंपरी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., फडतरी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., खुटबाव रस्ता ते राजगे वस्ती खडीकरण करण्यासाठी १० लाख रुपये रु., मांडवे या गावात ग्रामपंचायत जागेत ६ मीटर वरती ४०-४८ वॅट फिटिंग स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., मानेवाडी (कोथळे) या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., लोंढे मोहितेवाडी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., शिंदेवस्ती (पिंपरी) या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु. असा १९.७० निधी मंजूर करण्यात आला आहे. मांडवे जिल्हा परिषद गटात ३४१.८८ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
यशवंतनगर जिल्हा परिषद गटातील माळीनगर पंचायत समिती गणात बिजवडी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., सभा मंडप बांधण्यासाठी ९ लाख रु., माळीनगर या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी १ लाख २० हजार रु., बाजार कट्टा बांधणे व सुशोभीकरण करण्यासाठी ५ लाख रु., सभा मंडप बांधण्यासाठी ९ हजार रु., माळेवाडी (अकलूज) या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., सवतगव्हाण या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., असा २६.९० रुपये निधी मंजूर केला आहे. यशवंत नगर पंचायत समिती गणात
उदयनगर या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., चौंडेश्वरवाडी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., साखळकर वस्ती येथील धनाजी साखळकर वस्ती ते खंडाळी रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ९ लाख रु., यशवंतनगर या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., विजयवाडी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु. असा १२.६० निधी मंजूर करण्यात आला आहे. यशवंत नगर जिल्हा परिषद गटासाठी ३९.५० रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
वेळापूर जिल्हा परिषद गटातील खडूस पंचायत समिती गणात खुडूस या गावात खुडूस, पानीव ते विझोरी या कामांसाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून २८३.३४ रु.,खुडूस येथील ग्रामपंचायत जागेत ६ मिटर वरती ४०-४८ वॅट फिटिंग स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., खुडूस महालीनराया निमगाव रस्ता यासाठी ८ लाख रु., झंजेवाडी (खुडूस) या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., डोंबाळवाडी या गावात ग्रामपंचायत डोंबाळवाडी गावठाण ते सुंदर नगर बीबीएम रस्ता करण्यासाठी १० लाख रु., तरंगफळ या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., पानीव या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., सभा मंडप बांधण्यासाठी ९ लाख रु., विझोरी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., असा ३१५.१९ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे वेळापूर पंचायत समिती गणात पिसेवाडी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., वेळापूर तांदुळवाडी एमडीआर २०८ साठी ४९० रु., वेळापूर (प्ररामा-१५) ते महाळुंग पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून ५९५.७६ रु., वेळापूर येथे शासनाच्या जागेत ६ मीटर वरती ४०-४८ वॅट फिटिंग स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., वेळापूर येथे स्व. शंकरराव मोहिते पाटील विद्यालय येथे हायमास दिवा बसवण्यासाठी १ लाख ३० हजार रु. असा १०८९.२१ निधी मंजूर करण्यात आला आहे. वेळापूर जिल्हा परिषद गटासाठी १४०४.४० रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
संग्रामनगर जिल्हा परिषद गटातील मेडद पंचायत समिती गणात उंबरे दहिगाव या गावात ग्रामपंचायत जागेत ६ मीटर वरती ४०-४८ वॅट फिटिंग स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., कचरेवाडी या गावात ग्रामपंचायत जागेत ६ मीटर वरती ४०-४८ वॅट फिटिंग स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., कदमवाडी (फोंडशिरस) या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., चाकोरे या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., तिरवंडी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३ लाख रु., मारकडवाडी (फों.) या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., मेडद या गावात ग्रामपंचायत जागेत ६ मीटर वरती ४०-४८ वॅट फिटिंग स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., असा 10.35 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. संग्राम नगर पंचायत समिती गणात आनंदनगर या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., कोंडबावी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी १ लाख ८९ हजार रु., अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 3 लाख रु., गिरझणी या गावात गिरझणी ते संग्रामनगर पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून २५५.६१ रु., स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३ हजार रु., वटपळी या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु., संग्रामनगर (अकलूज) या गावात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी ९० हजार रु. असा रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. संग्राम नगर जिल्हा परिषद गटासाठी २७७.३६ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
माळशिरस नगर पंचायतीसाठी अकलूज रोड ६१ फाटा ते रावसाहेब देशमुख यांच्या घरापर्यंत पोल ६ मिटर वरती ७२ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., अकलूज रोड ते प्रकाश मंजूळकर यांच्या घरापर्यंत पोल ६ मीटर वरती ७२ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., अकलूज रोड ते रविराज वाणी यांच्या घरापर्यंत पोल ६ मिटर वरती ७२ वॅट फिटिंग स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., अकलूज रोड शेंडगे वर्कशॉप ते दीपक पवार यांच्या घरापर्यंत पोल ६ मिटर वरती ७२ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., गोरक्ष नगर ते चौगुले वस्ती येथे ६ मिटर वरती ७२ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., चौगुले वस्ती अंतर्गत ६ मिटर वरती ७२ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख २५ हजार रु., जानकर प्लॉट ते काळे वस्ती येथे ६ मिटर वरती ७२ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख ५० हजार रु., लावंड मळा ते हनुमंत वाघमोडे वस्ती ते शिवाजी वळकुटे वस्ती येथे ६ मिटर वरती ७२ वॅट फिटिंग स्ट्रीट एलईडी दिवा बसवण्यासाठी १ लाख रु., माळशिरस नगरपंचायत हद्दीतील माऊली चौक या ठिकाणी सिटी सर्वे नंबर ७१३ मध्ये नवीन सभागृह व वाचनालय इमारत बांधणे ३० लाख रु., मिसाळ वस्ती समोर ६१ फाट्यावरती आरसीसी पूल बांधणे १० लाख रु., विलास काळे यांच्या घरासमोर ५८ फाट्यावरती आरसीसी पूल बांधणे १० लाख रु., शहरातील मेन पेठ ते अस्वले यांच्या घरापर्यंत पेविंग ब्लॉक व आरसीसी गटार करणे २५ लाख रु., शिक्षक कॉलनी येथील खताळ बिल्डिंग ते सपकाळ मेजर यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १५ लाख रु., सारंग गुजरे यांच्या घरासमोर ५८ फाट्यावरती आरसीसी पूल बांधणे १० लाख रु., होलार वस्ती येथील विविध ठिकाणी पेविंग ब्लॉक आरसीसी पाईप गटार व काँक्रीट रस्ता करणे ५० लाख रु., असा माळशिरस नगरपंचायत साठी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
अकलूज नगर परिषद हद्दीमध्ये अकलूज ते वेळापूर रस्ता सी आय आर एफ फंडातून १,६६६.०० रु., अकलूज जयशंकरनगर येथे हायमास्ट दिवा बसविणे १ लाख ३० हजार रु., स्ट्रीट लाईट बसवणे ३ लाख रु., अकलूज रोड होलार वस्ती येथे नवीन सभा मंडप बांधणे ९ लाख रु. असा १६७९.३० निधी मंजूर करण्यात आला आहे. माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी ५४ कोटी ३९ लाख ६० हजार रुपयाचा निधी मंजूर करून कार्य तत्पर पाणीदार खासदार यांनी विकासासाठी दमदार कामगिरी केलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng