माढा लोकसभेचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माळशिरस विधानसभेचे आ. राम सातपुते यांची सांत्वनपर भेट घेतली.
मांडवे (बारामती झटका)
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांची माळशिरस तालुक्यातील मांडवे ५० फाटा येथील श्रीराम निवासस्थान येथे शुक्रवार दि. ३० जून २०२३ रोजी सकाळी सांत्वनपर भेट घेतली.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे सोमवार दि. २६/०६/२०२३ रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी दुःखद निधन झालेले होते. त्यांच्यावर मूळगावी डोईठाण ता. आष्टी, जि. बीड, येथे अंतिम संस्कार करण्यात आलेले होते. सर्व विधी क्रियाकर्म करून शुक्रवार दि. ३०/०६/२०२३ रोजी सर्वांना भेटीसाठी माळशिरस मतदारसंघात उपलब्ध झालेले आहेत.
यावेळी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng